भोरखेडा पटेल विद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न
त-हाडी-
आर. सी. पटेल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे आश्रयदाते स्व.रसिकलालजी पटेल उर्फ पप्पाजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोरखेडा काॅलेजचे प्राचार्य आर.एफ.शिरसाठ होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सी.जी.पाटील होते.स्व.पप्पाजींच्या प्रतिमेचे पुजन होऊन वादविवाद स्पर्धेला सुरुवात झाली.
स्व.पप्पाजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या वादविवाद स्पर्धेचा विषय होता. ‘
आजच्या महिलांना स्वातंत्र्य आहे का? ‘ तीन गटात झालेल्या या वादविवाद स्पर्धेत ४९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.त्यात ५ वी ते ७ वी च्या प्रथम गटात प्रथम क्रमांक श्रीराम गुंजन उदयम, द्वितीय क्रमांक पाटील लतिका श्रीराम तर तृतीय क्रमांक सोनवणे लावण्या जितेंद्र यांनी मिळवले. ८ वी ते १० वीच्या द्वितीय गटात उत्तेजनार्थ सह प्रथम ३ क्रमांक काढण्यात आले. त्यात प्रथम वैष्णवी बाळू गुजर , द्वितीय भाविका हितेंद्रसिंग राजपूत व प्रतीक दिनेश राजपूत यांना विभागून देण्यात आले.
तृतीय क्रमांक दिपाली कैलास शिरसाठ, उत्तेजनार्थ क्रमांक आयुश्री ईश्वर धनगर यांनी मिळवले.तर ११वी,१२ वी च्या ज्युनिअर कॉलेज गटात प्रथम क्रमांक प्रेरणा नाटुलाल श्रीराव, द्वितीय क्रमांक राठोड रंजना शंकर, तृतीय क्रमांक संजना कैलास बाविस्कर तर उत्तेजनार्थ बक्षीस रोशनी संजय वाघ यांनी मिळवले. तर विशेष पुरस्कार पवार सोनिया इंद्रजीत हिला देण्यात आला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री.एन.डी.चव्हाण,एस.आर.देसले.पी.टी.चौधरी,एन.वाय.बोरसे,एस.एम.पाटील,व्ही.एस.इशी,डी.आर.राजपूत,व्ही.बी.शर्मा,पी.एस.परदेशी,आफ्रिद पटेल,जे.डी.पाटील, तुषार पाटील,चंदन पावरा, सुनील पावरा,सुभाष निकुंभे,एम.टी.पटेल, दिपाली निकम,रुपाली तिरमले, ऐश्वर्या मोराणकर यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.जी.वाडिले सर यांनी केले.स्पर्धेचे परीक्षण एस.एम.पाटील व आर.जी.पाटील यांनी केले.तर एस.आर.देसले यांनी आभार मानले.







