म्हसवड – पंढरपूर महामार्गासाठी जमीनी जावुनही संपूर्ण सुळेवाडी गावच मोबदल्यापासुन वंचीत
विश्वजीत गोरड/ पिलीव प्रतिनिधी-
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ई हा म्हसवड – पिलीव – पंढरपूर महामार्गाचे काम बऱ्यापैकी झाले आहे यासाठी भूसंपादन सुद्धा झाले .यामध्ये माळशिरस तालुक्यातील पिलीव, कुसमोड, मळोली ,तांदुळवाडी या गावातील भूसंपादन झाले आहे. या चारच गावांना मंजुरी मिळाली आहे .
या गावातील बाधीत शेतकऱ्यांना नोटीसाही देणयात आल्या आहेत .तर काही बाधीत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई साठी प्रस्तावच सादर केलेले नाही. तर या शेतकऱ्यांनी माळशिरस तहसील कार्यालयात २९ सप्टेंबर रोजी उपस्थित राहुन प्रस्ताव व त्रुटी ताबडतोब दुर करण्यासाठी विशेष शिबीर ठेवण्यात आले आहे. पण याठिकाणी माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी गावातुन हा महामार्ग गेला आहे
यामध्ये १०० ते १२५ शेतकऱ्यांनच्या जमीनी गेलया आहेत पण हे संपूर्ण गावच यातुन वगळले आहे. एवढया जमीनी शेतकऱ्यांच्या जावुनही ना एकाही शेतकऱ्याला मदत किंवा चक्क सर्व गावच यातुन वगळले आहे याविषयी शेतकऱ्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी अकलुज, जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्याकडे रितसर तक्रारी केल्या होत्या पण कोणीही या बाधीत शेतकऱ्यांनची व्यथाच ऐकुन घेतलेली नाही .
शेतकऱ्यांच्या स्वतच्या मालकीच्या सुळेवाडी हद्दीतील जमीनी यामध्ये गेल्या आहेत यामध्ये एक दोन शेतकरी नाहीत तर चक्क १०० च्या आसपास शेतकऱ्यांनच्या जमीनी जावुनही प्रशासनाने भूसंपादन करताना या संपूर्ण गावाचा विचार न करता गावच वगळुन टाकले आहे.
यामुळे सध्या या बाधीत शेतकऱ्यांनमध्ये प्रचंड असंतोष असुन सर्व शेतकरी सध्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत .शासनाने ताबडतोब आमचा विषय मार्गी लावावा अशी या सुळेवाडी येथील बाधीत शेतकऱ्यांनची आहे. याविषयी आपण आमदार रामभाऊ सातपुते ,तहसीलदार, उपविभागीय अधिकारी अकलुज यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे संबंधित बाधीत शेतकऱ्यांनी सांगीतले.







