तऱ्हाडी येथे ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी” एक तारीख एक तास श्रमदान”कार्यक्रम संपन्न
तऱ्हाडी:-भारत सरकारच्या निर्देशित केल्यानुसार 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून संपूर्ण भारतामध्ये एक ऑक्टोबर रोजी तऱ्हाडी ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय. माध्यमिक विद्यालय. प्राथमिक शाळा मंगल कार्यालय. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा. शिवाजी महाराज पुतळा परिसरात या ठिकाणी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर. उपसरपंच उजनताई अहिरे .ग्रामविकास अधिकारी देविदास धाडे यांच्या हस्ते “एक तारीख एक तास श्रमदान”कार्यक्रम आयोजित करण्यात आला . शासनाने सुचविल्या प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी जाऊन स्वच्छता करुन कचरा संकलन करून घंटागाडीत टाकुन शोषखड्डात टाकण्यात आले
यावेळी माध्यमिक विद्यालय येथे तापी परीसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे . सचिव विजय भामरे. मुख्याध्यापक एन एच कश्यप सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालय जवळ सरपंच व उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य प्राथमिक शाळा परीसरात पदोन्नती मुख्याध्यापक राजेंद्र फकिरा पाटील व शिक्षक तसेच मल्हार सेना उपाध्यक्ष सुनील धनगर .गट नेते तुळशीराम भामरे. पोलिस पाटील प्रतापसिंग गिरासे माजी सरपंच सुदाम भलकार .माजी चेअरमन स़ंजय जाधव मराठा पाटील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण.महेद्र खोंडे. अंगणवाडी सेविका मदतनीस कार्यक्रमात सहभागी झाले होते







