डोंगरगाव येथे ” स्वच्छता ही सेवा ” श्रमदान अभियान अंतर्गत मोहीम यशस्वी स्वच्छता साहित्याचे वाटप
. _______________________________
डोंगरगाव ( प्रतिनिधी )
आर आर पाटील – दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी डोंगरगाव ग्रामपंचायतीत १ तारीख १ तास स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत सकाळी १० वाजता जिल्हा बँकेचे मा संचालक प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील यांच्या उपस्थितीत वरील कार्यक्रम संपन्न झाला प्रथम ज्येष्ठ नागरिक म्हणून निंबा गना पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली
या दिवशी ग्रामस्थांनी एकत्र येऊन जि प शाळा ग्रामपंचायत परिसर बजरंग मंदिर परिसर व गावात स्वच्छता केले यावेळी स्वच्छतेची शपथ देण्यात आली गावात ठिकठिकाणी मोठ्या कचराकुंड्या ठेवण्यात आल्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कचरा वाहण्यासाठी इलेक्ट्रिकल सायकल देण्यात आली डॅसबिनचे वाटप करण्यात आले तरुणांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायामाचे साहित्य वाटप करण्यात आले
या दिवशी प्रकाश पाटील यांचे समवेत लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील उपसरपंच अनिता पाटील आरोस्तोल पाटील ग्रा प सदस्य कल्पना पाटील माया भील कस्तुराबाई भिल ज्योती पाटील संजय पाटील ग्रामसेविका जयश्री पाटील अंगणवाडी सेविका स्वाती पाटील कमलबाई पाटील विद्या निकम विकासो चेअरमन निंबा गणा पाटील एस ए पाटील पत्रकार आर आर पाटील समाजसेवक पांडुरंग कोळी रोजगार सेवक ज्ञानेश्वर कोली ग्रा प ऑपरेटर गणेश पाटील वामनदादा वासुदेव पाटील रवींद्र पाटील चंद्रकांत पाटील भोला भाऊ गोसावी भास्कर पाटील विकी पैलवान हिरालाल भील वेलचंद भील दगडू निकम ग्रामस्थ महिला इत्यादी उपस्थित होते







