विस्तारीत टेंभूच्या ८ टी. एम. सी. पाण्यास अंतिम मंजूरी – मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र शासनाचा निर्णय
आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पाठपुराव्याला यश
दुष्काळी खानापूर आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील 34 गावातील शेतक-यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर हे गेली 3ते 4 वर्षापासून पाठपुरावा करीत होते. टेंभू विस्तारीत योजनेसाठी आठ टी. एम. सी.पाणी उपलब्ध करुन देण्यास महाराष्ट्र शासनाने आज अंतिम मंजूरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आमदार अनिलभाऊ बाबर याना आज वर्षा निवासस्थानी दिला.
टेंभू योजनेसाठी मंजूर असलेल्या २२ टी. एम. सी. पाण्याचे वाटपाचे नियोजन पूर्ण झाल्यामुळे आणखी नविन गावे आणि क्षेत्र वाढविण्यासाठी पाण्याची उपलब्धता नव्हती त्यामुळे गेल्या 4 वर्षापासून आमदार अनिलभाऊ बाबर व इतर लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते.
राज्य शासनाने पत्र जा. क्र. २०२१(२१६/२०२१) दि २९/०४/२०२२ नुसार ८ टी. एम. सी. अतिरिक्त पाणी टेंभू उपलब्ध करुन दिलेले आहे. परंतू ही तत्वत: मंजूरी होती. तोपर्यंत विस्तारीत टेंभू उपसा सिंचन योजनेचा तृतीय प्रशासकीय मान्यतेसाठी अहवाल महाराष्ट्र शासनास ८ मे २०२३ रोजी मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यासाठी 8 टी एम सी पाणी उपलब्धतेस अंतिम मंजुरी आवयक होती. त्यामुळे सुप्रमा मिळण्यासाठी सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे.
आठ टी. एम. सी. पाण्यासाठी अंतिम मंजूरी मिळावी आणि उपलब्धता झालेनंतर या टेंभू पासून वंचित गावांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी तृतीय सु.प्र.मा. मिळणे अत्यंत गरजेचे होते .
यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की, टेंभू योजनेच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) कॅबिनेट मध्ये आणून लवकरच मान्यता दिली जाईल.







