झेंडूच्या लागवडीतून त्याने शोधला उत्पन्नाचा मार्ग……
पितृपक्षात 100 रुपये किलो दर….
त-हाडी- महेंद्र खोंडे
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील काही शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड करून उत्पनाचा मार्ग शोधला आहे.
रावसाहेब शिवाजी पाटील यांची स्वतःची ३ हेक्टर जमीन आहे. यावर्षी त्यांनी १ हेक्टर क्षेत्रात झेंडूची लागवड केली.तर उर्वरित क्षेत्रावर कांदा, मका, कापूस इतर पिकांची लागवड केली आहे.त्यांना नवरात्राच्या उत्सवात चांगला भाव मिळेल अशी अशा आहे.
मागिल वर्षी झेंडूला चांगला दर मिळल्याने त-हाडी येथील काही शेतकरी झेंडू पिकाकडे वळले आहे. शिरपूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर झेंडूचे उत्पादन घेतले जाते. झेंडूच्या जातीनुसार उत्पन्न घेतले जाते. त्यानुसार त्याचे दरही ठरलेले असतात .यावर्षी ज्या आशेने उत्पन्न चांगले घेतले आहे.त्याची पूर्तता या दसऱ्याला चांगला दर मिळून पूर्ण होईल अशी अशा शेतकऱ्यांना आहे. असाच दर असल्यास नक्कीच खर्च निघून चांगल्या प्रमाणात उत्पन्न हातात येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
१ हेक्टर क्षेत्रात रावसाहेब यांना आतापर्यंत १५ हजाराच्या आसपास खरच आला आहे. झेंडूपासून सुमारे तीस हजार रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळेल अशी अशा आहे. नांगरट, भर लावणे, रोपे, मजुरी (लागवड, तोडणी, भांगलण), रासायनिक खते, कीडनाशके असा सर्व मिळून १, हेक्टर क्षेत्रात १५ हजारच्या आसपास खर्च झाला आहे .
किडीमुळे काही प्रमाणात नुकसान….
यंदा झेंडूला दर चांगला असतानाही झेंडू फुलावर कीड मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे शेतकऱ्यांना औषधीचा खर्च मोठ्या प्रमाणात झाला.झेंडूवर पांढरी माशी, मावा, तुडतुडे,त्यामुळे थोड्याफार प्रमाणात उत्पनात घट होऊ शकते.
फोटो – शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील रावसाहेब शिवाजी भामरे यांचा त-हाडकसबे शिवारातील झेंडू फुलाची बहरली शेती (महेंद्र खोंडे त-हाडी)







