क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरा.
त-हाडी – प्रतिनिधी शहादा तालुक्यातील कोढावळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात ग्रामस्वच्छता मोहीम हाती घेत स्वच्छता बाबत शपथ घेण्यात आली तर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त श्रमदान व स्वच्छता मोहीम राबवली तसेच गावातील संत सावता माळी समाज सभागृह, हनुमान चौक, एकलव्य चौक, कल्याण पुरा परिसर विद्यार्थीनी स्वच्छता केली सर्व इं५ वी ते इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी हजर राहुन गावात १ तारीख १ तास या मोहिमे अंतर्गत गावात स्वच्छता अभियान आयोजित केले.
विदयार्थ्यांनी संविधान म्हणून मनापासून स्वछतेचे कामाविषयी आनंद व्यक्त केला. शाळेच्या व गावातील जेष्ठ ,तरूण मित्र मंडळ यांच्या सहकार्याच्या मदतीने अभियान राबविण्यात आले. ,उपशिक्षक प्रमोद परदेशी, यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, व भारताचे 3 रे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी माहिती दिली तसेच तंबाखू मुक्त, अभियान, धूम्रपान मुक्ततेची शपथ दिली मुख्याध्यापक जे,पी माळी डी.एस.जगताप, आर.एच.खैरनार,वाय.एस.शिंपी,जी.डी वाल्हे,के.एस.सैंदाणे, एस.पी.सोनवणे,एम.एम.माळी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी आर .डी.माळी,आर.एम.बागुल,एस.डी.बैसाणे सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.







