आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या आव्हानाला दाखविली केराची टोपली.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या आव्हानाला दाखविली केराची टोपली.
पुण्यात येऊन दाखवा म्हणणारे अजित पवार गटाचे कार्यकर्ते यांना जणू पडळकर यांनी काडीचीही किंमत दिली नाही. आमदार गोपीचंद पडळकर पुण्यात तर आलेच पण पुण्यामध्ये महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित दिवस भर कार्यशाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि वाढदिवस थाटामाटात साजरा केला.
आश्चर्य म्हणजे एक आमदार जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस यांनी एक जुना प्रामाणिक सहकारी म्हणून समजिक भान जपत मोठ्या आनंदात वाढदिवस साजरा केला.
राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना विचारले असता त्यांनी अगदी मनमोकळे पणाने उत्तर दिले की सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पटणारे नाही तसेच कोण कुठेही जातेय, कोणाचा काय स्वार्थ आणि परमार्थ महाराष्ट्राच्या तरुण पिढीला किंचित ही पटलेला नाही, तसेच जुन्या आठवणींना उजाळा देत नेत्याच्या वाढदिवस निमित्ताने नातेवाईक म्हणून सामाजिक भान जपत हार्दिक शुभेच्छा देणे काही गैर वाटत नाही. खरंच राजकारण आणि समाजकारण सध्या तरी सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पटणारे नाही.
यामध्ये असे सामाजिक भान जपून राजकारण विरहित शुभेच्छा तर देणे महत्वाचे आहेच पण कोणी कोणाला आव्हान देऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत, अशीच चर्चा सगळीकडे चालू आहे. वरील दोन्ही फोटोवरून असे च वाटते की काम करणारे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कोणीही रोखू शकत नाही.
खरच जर धनगर समाजाच्या समस्यांवर तोडगा काढायचा असेल तर अशीच सामाजिक बांधिलकी जपून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पक्ष पार्टी विरहित फक्त धनगर समाज केंद्रित समाजातील मुख्य प्रश्नावर रिझल्ट मिळेलच असे सर्वसमावेशक आंदोलन हाताळण्याची गरज आहे असे सर्वच स्तरातून भूमिका तयार व्ह्यायला लागली आहे. समाजामध्ये गैरसमज पसरवून भांडणे लावन्याचा आणि मुख्य प्रश्नाला कोण बगल देत असेल तर हे धनगर समाज कदापी सहन करणार नाही.आमदार गोपीचंद पडळकर हे संघर्षातून तयार झालेले नेतृत्व आहे, गेली कित्तेक वर्ष असे बरेच छोटे मोठे आव्हाने त्यांनी लीलया पार केलेले आहेत.