आटपाडी नगरपंचायत रस्त्याची दुरवस्था, रस्ता दुरुस्त होणार का ? रहिवाशांचा संतप्त सवाल.
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील उमेश जुगदर यांच्या घरापासून संभाजी शेठ पाटील यांच्या शिवम प्लाझा घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून गेल्या पंधरा वर्षांत सदर रस्त्याच्या भूमिपूजनाचे अनेकांनी अनेक नारळ फोडले आहेत.
प्रत्येक वेळी आटपाडी शहरांमध्ये पाऊस झाला की सदर रस्त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडते. पायी चालत जाणे किंवा गाडीवरून जाणे देखील मुश्किल होत आहे. प्रत्येक वेळच्या छोट्या-मोठ्या पावसात येथे पायी चालणाऱ्यांचे व गाड्या चालविणाऱ्यांच्या गाड्या घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून युवा नेते संभाजी शेठ पाटील यांनी स्वखर्चातून अनेक वेळा रस्ता दुरुस्त करून रहिवाशांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. लोकप्रतिनिधी व नगरपंचायतने सदर रस्त्याच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्ता करावा अशी मागणी होत आहे.