कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
( प्रतिनिधी ) ॲड . दत्तात्रय फडतरे
कर्जत तालुक्यातील मिथीला नगरी , पोलिस ग्राउंड समोरिल भागातून एका चारचाकी वाहना ची चोरून नेल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता सुमारास उघडकीला आली आहे. या संदर्भात दुपारी १ वाजता कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, मयूर देवराम फडतरे (वय 29 , मूळ रा. बोपगाव, ता . पुरंदर, जि .पुणे ) राहणार कर्जत , जिल्हा – रायगड येथे उसाच्या रसाचे दुकान आहे . पत्नी व मुलीसह वास्तव्याला असून रसाचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. ७ नोव्हेंबर रोजी राञी ९:३० वाजता त्यांनी त्यांची सफेद रंगाची चारचाकी स्कॉर्पिओ वाहन क्रमांक (एमएच १२ पी.झेड ७०७० ) ही बिल्डिंग समोरील पार्किंग मध्ये भारत गॅस गोडावूनच्या जवळ उभी केली होती. ०७ नोव्हेंबर ते ०८ नोव्हेंबरच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही चारचाकी वाहन चोरून नेल्याचे घटना बुधवारी दुपारी १२:३० वाजता समोर आली.
त्यांनी सुरुवातीला नातेवाईक , सर्व मित्र यांच्याकडे तसेच परिसरात सर्वत्र शोध घेतला , परंतु , वाहनाबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. दुपारी १ वाजता मयूर फडतरे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
वडील देवराम फडतरे यांच्या मालकीची सफेद रंगांच्या चारचाकी महिंद्रा स्कॉर्पिओ च्या समोरील काचेवर ‘ कानिफनाथ कृपा ‘ असून मागील काचेवर ‘ क्षञियकुळावंतस ‘ असे भगव्या रंगात लिहीलेले आहे . उजव्या बाजुच्या दरवाज्यावर ताज , व त्याखाली ‘ मराठा ‘ असे काळ्या रंगात लिहीलेले आहे .बंपर समोर एक लोखंडी पाईप वेल्डींग केलेला आहे .
मयूर. फडतरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कर्जत पोलिस करीत आहे.