गोरगरीब जनतेला राज्य सरकारचे आणखी एक गाजर. आनंदाचा शिधा म्हणजे तोंडाला पुसली पाने.
महेंद्र खोंडे
त-हाडी : सन २०२२ ला राज्यात राजकीय भूकंपाच्या नंतर जनतेला पहिलेच ‘ आनंदाचा शिधा ‘ हे भुलभुलैय्या गाजर दाखवून गोरगरिबांना आकर्षीत केले यात साखर, तेल, चनादाळ , प्रति एक किलो दिवाळी सणासुदीला दिल्या गेला आणि जनता सरकार वर खुश झाली. आता मात्र राज्य सरकारने जनतेला आणखी एक गाजर दाखवले असुन नवीन ‘ आनंदाचा शिधा ‘ मध्ये जनू काही जनतेच्या तोंडाला पाने पुसले, असा गोरगरिबांची थट्टा करणारा निर्णय घेण्यात आला असून पुर्विचे प्रती एक किलो वजनाचे किराणा आता थेट अर्धा किलो वर आणून ठेवला आहे. याचा जनतेत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
राज्य सरकारने केंद्र सरकारला आनंदाचा शिधा बाबतीत जी माहिती पुरवली गेली त्या आधारे केंद्रीय महिला बाल कल्याण समिती च्या चित्रा वाघ ह्या आनंदाचा शिधा बाबतीत राज्य सरकारची प्रशंसा करीत जनतेला उत्तरदायी होण्याचे आवाहन करीत होत्या. मात्र तसे काही झाले नाही.
आज धुळे जिल्ह्यातीलसह ग्रामीण भागात आनंदाचा शिधा वितरण करण्यात आले. त्यात साखर, रवा, गोडेतल, मैदा, पोहे आणि चना दाळ असे सहा प्रकारचे सामान देण्यात आले. मात्र हे साहित्य केवळ गरिबांच्या तोंडाला पाने पुसल्या गत झाले आहे. आज सायंकाळी सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली अनेक बाया बापड्या घोर निराशा घेऊन परतल्या कारण त्या ‘ आनंदाचा शिधा ‘ च्या पिशवी त फक्त साखर आणि गोडेतेल हे दोनच नग एक ,एक किलो वजनाचे होते तर अन्य चना दाळ अर्धा किलो, मैदा, रवा, व पोहे सर्व प्रत्येकी अर्धा अर्धा किलो वजनाचे होते. यावर काही जानकार गृहिणीचे मत घेतले असता. साखर एक किलो, रवा, मैदा, चना दाळ पोहे हे सर्व अर्धा अर्धा किलो वजनाचे असल्याने साखर आणि तेल वगळले तर उर्वरित भाग
भाग फक्त दोन किलो वजन होते हे दोन किलो वजनाचे पदार्थ एका कुटुंबातील चार ते पाच सदस्यांना केवळ एक वेळचे जेवण होऊ शकते तेव्हा त्यांची दिवाळी गोड कशी होईल.
अशा कटू सत्य प्रतिक्रिया या महिला गृहिणींने दिल्या. पती, पत्नी आणि दोन अपत्य, आणि समजा जर का ” मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहुया ” म्हणत भाचा भाची आले तर मामा मामी ला उपाशीपोटी राहुन पाहुण्यांना दोन घास खाऊ घालावे लागतील ‘ असा पेच या राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा मंत्र्यांनी आणला आहे. तेव्हा तातडीने दिवाळीच्या आगोदरच केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री यांनी राज्य सरकारला धारेवर धरुन या आनंदाचा शिधा, च्या बॅगेत किमान सन २०२२ इतकेच वजनाचे साखर तेल मैदा रवा चना दाळ नियमित करण्याचे युद्धपातळीवर निर्देश द्यावेत अशी मागणी गोरगरीब जनतेतून केली जात आहे.
प्रतिक्रिया
दिवाळी सण हा एक विशेष सप्ताह म्हणून साजरा केला जातो सरकारने जर गोरगरिबांच्या दिवाळीच्या खरोखरच गोड करायचे असेल तर आर्ध किलो ऐवजी चणाडाळ ,पोहे, मैदा, रवा हे एक एक किलो देण्यात यावे
डॉ जितेंद्र ठाकुर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
जिल्हा नियोजन समिती सदस्य
शिरपूर तालुक्यात लाभार्थी
४७५७३ प्राधान्य कुटुंब
१४२३६ अंत्योदय योजना लाभार्थी कुटुंब
एकुण लाभार्थी कुटुंब संख्या – ६१८०९







