पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप
ॲड . दत्तात्रय फडतरे
पुरंदर ( प्रतिनिधी )
तालुक्यातील बहुतांश गावामध्ये आयडिया – व्होडाफोन मोबाईल कंपनीला नेटवर्क नसल्यामुळे महिन्यांपासून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. इंटरनेट स्पीड अतिशय कमी आहे . आठवड्यातून चार दिवस ही नेटवर्क पूर्ण असत नाही . फोन करण्यासाठी देखील दिवस – दिवस नेटवर्क उपलब्ध असत नाही .बोलता -बोलता फोन कट होत आहेत , काही ठिकाणी अचानक नेटवर्क गायब होत आहे.एकाएकी आवाज येत नसल्यामुळे ग्राहकांमधुन संताप व्यक्त आहे.
सासवड शहर , बोपगाव , चांबळी , कोडीत , भिवरी ,गराडे , जेजुरी परिसरातील गावांमध्ये बरोबरच बेलसर , रानमळा , भिवडी भागात तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये आयडिया -व्होडाफोन मोबाईल नेटवर्क व्यवस्थित नसल्यामुळे नागरिकांमधुन नाराजी व्यक्त होत आहे. पाठीमागच्या महिन्यांपासून कंपनीच्या ग्राहकांचे फोन अचानक डिसकनेक्ट होतायेत ,फोनवर बोलणार्या व्यक्तीचा आवाज ही येत नाही. इंटरनेट स्पीड तर केवळ नावालाच आहे. कंपनीच्या अधिकृत हेल्पलाईन नंबरवरुन उडवाउडवीची उत्तर दिली जात आहेत यामुळे कंपनीचा भोंगळ कारभार आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
पुरंदर तालुक्यातील विविध भागात आपले सरकार केंद्र , अनेक ग्रामपंचायतीतील आॅनलाईन कामं पुर्ण करण्यास मोठया प्रमाणात अडथळे येत आहेत. शाळा ,महाविद्यालयातील , विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांचीही महत्वाची नेटवर्क काम रखडलेली आहेत.
मोबाईल कंपनीच्या वरिष्ठ आधिकार्यांनी त्वरित दखल घेवुन समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्यासाठी तातडीने प्रयन्त करण्याची मागणी होत आहे.
नागरिक आता आयडिया – व्होडाफोन कंपनीचे सीमकार्ड पर्याय म्हणून वापर करणे देखील सोडून देण्याच्या तयारीत आहेत . कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.