पुरंदरमध्ये ईव्हीएम चोरी प्रकरणी आधिकारी
निलंबित ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय
ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे ( प्रतिनिधी )
पुरंदर तालुक्यातील ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली . याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यामुळे काही दिवसांपासुन नागरिकांची गैरसोय सुरु आहे ,त्याप्रमाणे सध्या तात्पुरता प्रभारी राज आहे . परंतू , महसुल , भूसंपादन आदी सुनावणीसाठी तारीख पे तारिख सुरु असल्याने जनतेची काम खोळंबली आहेत . नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी सासवड येथील ॲड . दत्तात्रय फडतरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सासवड येथील तहसिल कार्यालयातील महसुल सुनावणी , वहिवाट रस्ता , कुळकायदा विभाग , भूसंपादनांसबंधी असणार्या महत्वाच्या सुनावण्या पाठीमागच्या काही आठवड्यांपासुन लांबणीवर पडल्या आहेत . सर्वसामान्य शेतकरी वर्ग ,पक्षकार , वकीलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे
पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपुत , यांच्या जागी नायब तहसिलदार दत्ताञय गवारी यांच्याकडे , प्रांतआधिकारी मोरे यांच्या जागी दौंड प्रांताचे निनाज मुल्ला अतिरिक्त पदभार असल्यामुळे अधिकचा कामाचा ताण येत आहे ,त्यातच तालुका दुष्काळाच्या छायेतून जात असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी कायम स्वरुपी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची गरज निर्माण झाली आहे .
राज्याचे मुख्यमंञी या नात्याने नागरिकांच्या अडी -अडचणी दुर करण्यासाठी तातडीने दखल घेण्यात यावी .कायमस्वरुपी तहसिलदार व प्रांतधिकारी यांची नेमणूक करावी .वेळापञकाप्रमाणे नियमित सूनावणी तारखा सुरु करण्यासबंधी निर्देश द्यावेत अशी मागणी ॲड . दत्तात्रय फडतरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सीएमओ कार्यांलयाकडुन तक्रारीची दखल
पुरंदर मधील सुनावणी तारखा यामध्ये महसुल , भूसंपादन , कुळकायदा वहिवाट रस्ता ,सुनावण्या लांबणीवर टाकत असल्याचे समोर आले आहे . याप्रकरणी ॲड . दत्तात्रय फडतरे यांना केलेल्या मागणीला मुख्यमंञी कार्यालयाकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे . आपला ई-मेल राज्याच्या महसुल विभागाकडे पाठविण्यात आल्याचे कळविले आहे.