कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकांबद्दल माध्यम प्रमुखांना उत्तर द्यावं लागणार ही दुर्दैवी बाब..
प्रेस क्लबच्या वतीने प्रेस कॉन्फरन्स संपन्न..
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यांमध्ये मागील सहा ..सात.. आठ ऑक्टोबर मध्ये तालुक्यामध्ये सर्वात जास्त वाचल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये तोतया पत्रकार आणि खंडणी संदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु ह्या बातम्या या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी द्वेषपूर्ण भावनेतून नावे न प्रसिद्ध करता मोगम छापलेल्या होत्या. या बातम्यांची दखल घेऊन आटपाडी तालुक्यातील प्रेस क्लबच्या सदस्यांनी शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन त्या विषयाची उकल केली आहे.
यावेळी बोलताना माध्यम प्रमुख अशोक पवार म्हणाले तालुक्यातील एक शिक्षक नेते उत्तम जाधव यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये खंडणी ब्लॅकमेलिंग करणारे तोतया पत्रकार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून लेखी अर्ज दिला होता. या अर्जाच्या आधारेच या पत्रकारांनी बातम्या छापलेल्या आहेत. परंतु बातमी छापत असताना बातमी संतुलित असावी दोन्ही बाजूचे मते त्या बातमीमध्ये असावीत ,असा नियम आहे .
मात्र या बातमीमध्ये या नियमाचे पालन झाल्याचे दिसत नाही. कारण ही बातमी उत्तम जाधव या शिक्षक नेत्यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे छापली आहे. त्या निवेदनामध्ये सदाशिव पुकळे दैनिक केसरीचे पत्रकार, प्रशांत देशमुख तेज महाराष्ट्र वार्ताचे पत्रकार व अशोक पवार एन. एम .न्यूज चे पत्रकार असा उल्लेख आहे .
यावेळी अशोक पवार म्हणाले मी पत्रकार तर आहेच परंतु मी एक माध्यम प्रमुख सुद्धा आहे .माझा rni आय रजिस्टर आहे. माझी कंपनी रजिस्टर आहे. जर माझे भारत सरकार कडे रजिस्टर असलेले प्रमाणपत्र आहे. तर मग मला तोतया पत्रकार असं संबोधलं जातं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की पत्रकारांना भारत सरकार वर सुद्धा विश्वास नाही. पुढे ते म्हणाले आपल्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या बाहेर माझं दहा राज्यांमध्ये नेटवर्क आहे. असं नेटवर्क असणारा महाराष्ट्रात दुसरा कोणी माध्यम प्रतिनिधी असेल तर शोध घेऊन सांगावे .ज्या ज्या माध्यमाच्या प्रतिनिधींनी चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत त्यांच्या मालकांशी आम्ही कायदेशीर पत्र व्यवहार करणार आहे.
तसेच यु. टी. जाधव या शिक्षक नेत्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये खोटी तक्रार अर्ज केला आहे. हा तक्रार अर्ज देत असताना त्याच्याबरोबर आणखी काही शिक्षक फोटोत दिसत आहेत .जर हा शिक्षक दोषी असेल तर याला हे शिक्षक साथ देत आहेत अस शाबित होत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन गटविकास अधिकारी तहसीलदार व पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. म्हणजे तपास यंत्रणा वर दबाव टाकत आहेत असं यातून सिद्ध होत आहे
यावेळी बोलताना प्रशांत देशमुख म्हणाले अशा पद्धतीच्या बातम्या प्रस्थापित माध्यमाचे प्रतिनिधी यासाठी सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रभाव वाढत चाललेला आहे. या मुळे आम्ही केलेल्या बातम्या तात्काळ लोकांपर्यंत पोहोचतात आणि यांनी केलेल्या बातम्या पाहण्यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागते म्हणून या लोकांना आमच्याबद्दल द्वेष आहे .
यावेळी बोलताना पत्रकार सदाशिव पुकळे म्हणाले अशा पद्धतीच्या बातम्या छापून एकमेकांवरती चिखलफेक करणे हे पत्रकारितेच्या हिताचं नाही.बोटावर मोजण्याइतके पत्रकार आहेत .पण यामध्ये सुध्दा कुरगुडी केली जात आहे.पत्रकार बांधवांनी सत्य छापावे.घटना वेगळी आणि आपण छापतो वेगळेच ..यामुळे वाचकांचा पेपरवरील विश्वास उडेल.छापणाऱ्या बातमीत कुठेतरी सत्यता असावी.
यावेळी हबीब मुलांनी घाटमाता न्यूज, तुकाराम गिड्डे गलाई समाचार ,राजू शेख टीव्ही न्यूज मराठी, दादासो वाक्षे लोककट्टा ,अंकुश मुढे आखुर टीव्ही, गणेश जुगदर शेतकरी संघटना ,ऑनलाइन अमोल काटे, कांतीलाल कारळे उपस्थित होते.
चौकट
सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपण चुकीचं समर्थन करू नये आपल्या खांद्यावरती चांगला समाज बनवण्याचं भार आहे आणि तो भार आपण पेलण्याचं काम करायचं आहे आपण जर चुकीच्या लोकांचे समर्थन केलं तर येणाऱ्या पिढीला चुकीचा संदेश जाणार आहे कोणतेही पाऊल उचलताना समाज हित डोळ्यापुढे ठेवून पाऊल उचलावं
अशोक पवार
चौकट
या पत्रकार परिषदेची आणखी एक विशेषता होती या पत्रकार परिषदेसाठी सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला होता आतापर्यंत आपण पत्रकार परिषद मध्ये प्रत्यक्ष पत्रकारांच्या बरोबर संवाद पाहत होतो परंतु जे पत्रकार प्रत्यक्ष पत्रकार परिषद स्थळी पोहोचू शकत नाहीत अशा पत्रकारांपर्यंत या ठिकाणी होत असलेली चर्चा व थेट सहभाग घेण्यासाठी गुगल मिट माध्यमाचा वापर करण्यात आला होता हा प्रयोग सर्वात पहिला प्रयोग असावा आतापर्यंत अनेक नेतेमंडळी ठराविक लोकांनाच पत्रकार परिषदेला बोलावून त्यांचं सिलेक्टेड म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवत होते. परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशातील कोणताही पत्रकार या परिषदेमध्ये कुठूनही भाग घेऊ शकत होता व तो आपलं प्रश्न थेट विचारू शकत होता.
फोटो. प्रेस कॉन्फरन्स मध्ये उपस्थित अशोक पवार व पत्रकार बांधव







