जिल्हा अधिकारी यांच्या विरोधात मंत्रालयासमोर उपोषण करणार – प्रकाश गायकवाड
आटपाडी प्रतिनिधी:-
आटपाडी तालुक्यातील तहसील कार्यालयामधील विविध समस्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी जिल्हा अधिकारी यांना दिनांक 21/03/2022, 23/06/2023, 14/09/2023 व 25/07/2023 रोजी निवेदन दिले होते .
परंतू जिल्हा अधिकारी यांनी या निवेदननुसार कोणती कारवाई केली आहे. याची सविस्तर माहिती प्रकाश गायकवाड यांनी मागितली आहे . तसेच जिल्हा आधिकारी यांना भेटून दिनांक 14/09/2023 रोजी सर्व हकीकत सांगूनही व लेखी निवेदनात सर्व तक्रारी व वर्तमान पत्राची बातमी जोडून दिली आहे . त्यावर अध्याप कोणतीही कारवाई केलेली नाही व महसूल मंत्री यांना भेटून दिनांक 03/10/2023 रोजी निवेदन दिले आहे . यावरही अध्याप कारवाई झाली नाही .
या विषयावर जिल्हा अधिकारी सांगली यांनी येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास निष्क्रिय जिल्हाअधिकारी यांच्या विरोधात महसूल मंत्री यांच्याकडे मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे असा इशारा प्रकाश गायकवाड यांनी दिला आहे .अशा इशारा मनसे कृषी सेलचे तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी नियोजन द्वारे दिला आहे.
फोटो निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांना निवेदन देताना प्रकाश गायकवाड व पदाधिकारी







