महिला शेतकरी शेतीशाळा चा शेती दिन उत्साहात
त-हाडी
स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषी मूल्य साखळी विकास शाळा संकल्पनेवर मका पिकाची बाजार भिमुख पीक प्रात्यक्षिके व मका पिकाची महिलाशेतकरी शेती शाळा शिरपूर तालुक्यात भटाने गावात घेण्यात आली.माविअ चे माध्यमातून लाभार्थी निवड व कृषी विभागाचे माध्यमातून शेती शाळेची अंमलबजावणी करण्यात आली,
भटाने येथे शेतीशाळा चा शेती प्रसंगी प्रकल्प संचालक, आत्मा,धुळे नवनाथ कोळपकर आणि विनय बोरसे उपप्रकल्प संचालक यांचे मारगदर्शनाखाली शेतीशाळा चा शेती दिन आयोजित करण्यात आला.
शेती दिना प्रसंगी शेतीशाळा चे महत्व विषद करून मका उत्पादक महिला शेतकऱ्यांना शेती शाळा चे वर्गातून विविध मका लागवडीचे तंत्र,खत व्यवस्थापन मका पिक व्यवस्थापन , मका पीक परिसंस्था , शत्रु कीड व मित्र किडी ची ओळख ,अमेरिकन लष्करी अळीची ओळख व व्यवस्थापन, मका पीक संरक्षण बाबत उजळणी कृषि सहायक महेन्द्र पाटील यांनी केली. मका पीक प्रक्रिया व प्रधानमन्त्री सूक्ष्मअन्न प्रक्रिया उद्योग कृषी पर्यवेक्षक एन एन महाजन यांनी माहिती दिली शेतीदिंन यशस्वीतेसाठी कृषि सहायक महेन्द्र पाटील यांनी प्रभावी आयोजन केले.
सुवर्णा दीपक पाटील यांच्या शेतावर महिला शेतीशाळेच्या कार्यक्रमास कृषी मित्र बीपीन पाटील व दीपक पाटील यांनी सहकार्य केले, यावेळी बहुसंख्य महिलानी उपस्थीत राहून कार्यक्रम उत्साहात शेतीदिन साजरा झाला







