उद्धव विभुते यांना जिवे मारण्याची धमकी
माडगूळ ता.आटपाडी येथील उध्दव गंगाराम विभुते यांनी
तुषार श्रीधर विभुते ,सौरभ श्रीधर विभुते यांनी जिवे मारण्याची धमकी दिली असल्याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे
व्हटसअप ग्रुपवरील बातमीच्या कारणावरुन तेथे येवून फिर्यादीस तू व्हाटस अप ग्रुपवर शिक्षा झालेबाबत बातमी का टाकली असे म्हणून दगडाने फिर्यादीची व त्यांचे आईस मारहान केली फिर्यादीची भांडणे सोडविण्यास त्यांची पत्नी मीना ही आली असता तिलाही शिवीगाळी दमदाटी करुन । धक्काबुक्की करुन त्या तिघांना व त्याचे कुटुंबीयाना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पुढील तपास पो.हे कॉ.ठोंबरे करीत आहेत.







