त-हाडी ग्रामपंचायत निवडणुकीत हालचाली सुरू
वार्ड रचना व सदस्य संख्या निश्चित प्रस्ताव सादर
त-हाडी :- शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील२०२४ते२०२९या कालावधी साठी पंचवार्षिक निवडणुकींच्या हालचालींना वेग आला असुन, शिरपूर तहसील निवडणुक शाखेकडुन वार्ड रचना व त्यातील सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयात मौजे त-हाडी तलाठी संतोष अहिरे व ग्रामविकास अधिकारी देवीदास धांडे, मंडळ अधिकारी मुकेश भावसार लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर व गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यात पाच वार्ड व त्यातील १३ ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून, शासनाने ठरवल्याप्रमाणे लोकांमधुन लोकनियुक्त सरपंचाची निवड होणार आहे.
वार्ड रचना….एकुण पाच
त-हाडी गावाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा मध्यभागाचा केंद्रबिंदू हा मानुन घड्याळाचा काटा जसा फिरतो त्यानुसार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते ओंकार भिल यांच्या घरा पर्यंत हा परिसर वार्ड क्रमांक एक मध्ये आहे.
यानंतर दगा फकिरा सोनवणे ते साहेबराव ओंकार पाटील, बापु धनगर यांचे घर, ते मीराबाई भिल यांचे घर वजु भिल पासुन ते अधिकर उखा पाटील ते हरिश्चंद्र सिताराम जाधव पासून महेंद्र कैलास गोसावी घरापर्यंत युवराज धनजी कुंभार श्रावण बुधा पाटील घरापर्यंत हा परिसर वार्ड क्रमांक दोन मध्ये निश्चित केला आहे, अशोक गुरव ते संतोष नाटु भामरे व ओंकार दशरथ पाटील घर ते मांजरेकर धनगर घर ते पोपट होळकर पाटील ते लक्ष्मण दशरथ पाटील घर ग्रामपंचायत कार्यालय ते युवराज तोगल पाटील घरापर्यंत आदी भाग वार्ड क्रमांक तीन मधे समाविष्ट करण्यात आला आहे.
हिरालाल गंगाराम कंरके घर ते एकनाथ चतुर भामरे व दत्तात्रय कुलकर्णी ते माधव परदेशी व सुनंदा बाई गुलाब परदेशी ते अशोक नथा भामरे ते नितीन वसंत पाटील (फरकाडे)ते विलास यादव भामरे पर्याय परिसर वार्ड क्रमांक चार मध्ये आहे जागा दोन आहेत
तर बाबुराव निंबा अहिरे ते सिताराम शिंदे व
भुरा भिका अहिरे ते संपुर्ण अभानपुर सह परिसर वार्ड क्रमांक पाच मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे
२०१९ च्या ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणुकी प्रमाणेच वार्ड रचना ठेवण्यात आली आहे.
सदस्य संख्या …१३
वार्डा क्रमांक तीन व चार मधे सदस्य संख्या दोन असुन वार्ड क्रमांक एक, दोन व पाच मधे तीन सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत वार्ड क्रमांक दोन मधे दोन सदस्य संख्या होती ती रोटेशन नुसार वार्ड क्रमांक तीन मधे ठेवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
एकुण पाच वार्डात १३ ग्रामपंचायत सदस्य संख्या लोकनियुक्त सरपंच अशी त-हाडी गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रभाग रचना व सदस्य संख्या निश्चित झाली असुन शिरपूर तालुक्यातील त-हाडी हे पश्र्चिम भागातील सर्वात मोठे गाव आहे सुमारे सात हजार मतदार असुन साहजिकच सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या नजरा त-हाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकिकडे लागल्या आहेत. १३ मार्च२०२४ ला येथील ग्रामपंचायत निवडणुकीची मुदत संपत असुन त्या अगोदर नवीन सदस्य व लोकनियुक्त सरपंचाची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीकोनातून निवडणुक हालचालींना सुरुवात झाली असुन वार्ड रचना व त्यातील सदस्य संख्या निश्चित झाली असुन आता आगामी मतदार यादी वाचन व वार्डातील सदस्यांचे आरक्षण सोडत या निवडणुकिंच्या कार्यक्रमांकडे ग्रामस्थांच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण आरक्षणा नंतरच खऱ्या लढती ठरणार आहेत मात्र आत्ता पासुन काही हौशी उमेदवारांनी पायाला घुंगरु बांधले असुन भावी सदस्य, सरपंच, उपसरपंच म्हणून उदो उदो सुरु झाल्याचे चित्र त-हाडीमध्ये पाहायला मिळत आहे.
फोटो :- त-हाडी ग्रामपंचायत कार्यालय







