अखेर आटपाडीच्या तहसीलदार बाई माने यांची बदली
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील तहसीलदार बाई माने यांची अखेर वडूज (खटाव )येथे बदली झाली आहे. आटपाडी तालुक्यांमध्ये तहसीलदार बी.एस. माने यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक वादग्रस्त प्रकरणे झाली असून यामध्ये सर्वात जास्त म्हणजे वाळू उपसा प्रकरणावर अनेक तक्रारी झाल्या तर काही युवक मंत्रालयासमोर आंदोलनाला बसले आहेत.
यापूर्वी त्यांची बदली झाली होती. परंतु त्यांनी मॅटमध्ये जाऊन दाद मागितली व पुन्हा त्यांना आटपाडी तच ठेवण्यात आले .परंतु आता त्यांचे बदली झाल्याचे पत्र मंत्रालयातून आले आहे.
सर्वात जास्त म्हणजे त्यांच्यावरती वाळू उपसा संबंधित अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी व अनेक कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या अनेक वेळा आंदोलने झाली अनेक तरुण उपोषणाला बसले होते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे.







