आर .सी. पटेल माध्यमिक विद्यालय भामपुर येथे भव्य सायकल वाटप कार्यक्रम संपन्न .
तऱ्हाडी:-आज दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालय भामपूर येथे मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या शुभ हस्ते भव्य सायकल व चष्मे वाटपाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच सुशीला ताई भील उपसरपंच बाळासाहेब चंद्रकांत देवरे. पोलीस पाटील संभाजी हनुमंतराव पाटील सामाजिक कार्यकर्ते जयराम बुधा पाटील नवे भामपूरचे सरपंच बाळासाहेब पाटील. उपसरपंच डॉ दोरीक पोलीस पाटील उमेश पाटील समन्वयक पोर्णिमा पाठक व सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय मुकेश भाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली. प्रस्ताविक मुख्याध्यापक व्ही पी. दिक्षित केले. सूत्रसंचालन दिनेश ठाकरे यांनी केले. पोर्णिमा पाठक यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीन विकास व्हावा
यासाठी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट दरवर्षी वह्या वाटप , पन्नास चष्मे वाटप , व बाहेर गावाहून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी साठी दहा सायकली वाटप व आरोग्य तपासणी करणे मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वरील कार्यक्रम घेत असतात. कार्यक्रम यशस्वीते साठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.







