कुरुंदवाडीची कुमारी साक्षी वगरे प्रथम
कुरुंदवाडी ता. आटपाडी येथील साक्षी मनोहर वगरे 12 विमध्ये कॉमर्स मध्ये 88.36 गुण मिळवून सुधागड एज्युकेशन सोसायटी जूनियर कॉलेज कळंबोली मध्ये प्रथम क्रमांक मिळवला .
वाणिज्य विभागातून बारावीमध्ये शिकत असताना जवळपास 200 च्या आसपास विद्यार्थी आहेत. त्यामध्ये साक्षी वगरे हिने प्रथम क्रमांक मिळवला. ग्रामीण भागातील सुद्धा मुली ,मुले प्रथम क्रमांक मिळवू शकतात हे यातून दाखवून दिले.
सुधागड एज्युकेशन सोसायटी जूनियर कॉलेज कळंबोली चे मुख्याध्यापक राजेंद्र पालवे व वर्गशिक्षिका दर्शना दरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. साक्षीने मिळवलेल्या प्रथम क्रमांकाचे परिसरामध्ये कौतुक होत आहे.







