तऱ्हाडी येथे विविध योजनेअंतर्गत विकास कामांचे लोकार्पण
संसदरत्न खासदार डॉ .हिना गावीत यांच्या हस्ते उद्घाटन
त-हाडी:-येथील ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या पाच वर्षात विविध योजनेअंतर्गत गावाचा विकास करण्यासाठी गेल्या वर्षी संसदरत्न खासदार डॉ.हिना गावित भाजपा माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर व सुनील धनगर गटनेते तुळशीराम भामरे यांच्या प्रयत्नाने दोन कोटी 92 लाख रुपयाचे विकास कामांची किती मंजूर केला होता.
त्या निधीअंतर्गत येथील 2515 इतर ग्रामीण विकास अंतर्गत खंडेराव मंदिर परिसर विविध सुविधा तऱ्हाडी व ममाने व अभाणपूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत जल कुंभ व पाईपलाईन टाकणे ममाने गावात ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण यांचे लोकार्पण संसद रत्न खासदार डॉ हिना गावीत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले
यावेळी भाजपा माजीअध्यक्ष राहूल रंधे.जि.प. सदस्य भिमराव ईशी लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनताई अहिरे पंचायत समिती सदस्य राहुल पावरा ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील.मंगलबाई भील. पोलीस पाटील प्रतापसिंग गिरासे ग्रामविकास अधिकारी देविदास धाडे व ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटनेते तुळशीराम भामरे व सुत्रसंचलन ज्ञानेश्वर भामरे यांनी केले







