शेतकरी दादा,१ रुपयामध्ये रब्बीचा पिक विमा काढला का…?
ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, तर गहू, हरभऱ्यासाठी पंधरा डिसेंबरची मुदत
आतापर्यंत शिरपूर तालुक्यात ५६ शेतकऱ्यांनी काढला रब्बीचा पिक विमा.
त-हाडी : पंतप्रधान पीक विमा
योजनेंतर्गत रब्बी पिकांसाठी विमा
काढण्यासाठी सरसावले असून , खरीप पीक विम्याप्रमाणेच रब्बी
पिकांसाठीदेखील शेतकऱ्यांचा हिस्सा
शासनाकडून दिला जाणार असून,
शेतकऱ्यांना आपल्या हिस्स्यातून
केवळ एक रुपया भरावा लागणार
आहे. या विमा योजनेत जास्तीत जास्त
शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे
आवाहन कृषी विभागाकडून करण्यात
आले आहे.
गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक
आपत्तीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात
नुकसान होऊन, शेतकऱ्यांना आर्थिक
नुकसान सहन करावे लागत असते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा काढला
तर पिकांना विम्याचे संरक्षण मिळते.
त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे
नुकसान झाले तर शेतकऱ्यांना
नुकसानभरपाई मिळू शकते. त्यामुळे
पीकविमा काढणे शेतकन्यांसाठी
फायद्याचे आहे. त्यातच आता
पीकविम्याचा हप्ता शासनाकडून
भरला जाणार असल्याने गेल्या
वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पीक विमा काढला जाण्याची शक्यता आहे. खरीप पीक विम्यांतर्गत शिरपूर तालुक्यात
२९ हजार ५६०
शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता.
कसा भरणार अर्ज….
शेतकरी आपला पीक विम्याचा अर्ज सीएससी केंद्रावर जाऊन भरू शकतात.यासाठी शेतकऱ्यांना पीकविमा भरताना आधारकार्ड, आधार नोंदणीची प्रत,
सातबारा उतारा, भाडेपट्टीची शेती असेल तर त्यासाठीचा करारनामा सहमती पत्र,
पीक पेरणी स्वयंघोषणापत्र आणि पासबुकची प्रत सादर करून इलेक्ट्रॉनिक
साक्षांकन करणे बंधनकारक आहे. पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी आपला बँकेचा खाते क्रमांक, पिकाखालील क्षेत्र, भूमापन क्रमांक इत्यादीची खातरजमा.
कोणते शेतकरी
घेऊ शकतात
भाग…
ही योजना कर्जदार तसेच
बिगर कर्जदार शेतकयांना
ऐच्छिक आहे.
अधिसूचित क्षेत्रातील
अधिसूचित पिकासाठी
खातेदारांच्या व्यतिरिक्त
भाडेपट्टीने शेती करणारे
शेतकरी या योजनेत भाग
घेण्यास पात्र आहेत.
नैसर्गिक आपती कोड
आणि रोगासारख्या
अकल्पीत प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान आल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळू शकते.
शिरपूर तालुक्यात आतापर्यंत ५६ शेतकऱ्यांनी रब्बी पिक विमा काढला असून अजूनही ३० नोव्हेंबर पर्यंत ज्वारीसाठी मुदत आहे तर गहू, हरभरा, कांद्यासाठी पंधरा डिसेंबरची अंतिम मुदत आहे.
…अशी आहे मुदत
● ज्यारीचा पीक विमा
काढण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत ची मुदत आहे.हरभरा, गहू व रब्बी कांद्यासाठी
१५ डिसेंबरपर्यंतची मुदत
आहे.
भात ,उन्हाळी भुईमूगसाठी ३१
मार्चपर्यंत विमा काढता येणार
आहे.







