उत्तरेश्र्वर कार्तिकी यात्रेत सोमनाथ माळी यांचा बकरा ठरला चॅम्पियन
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथील सालाबाद प्रमाणे उत्तरेश्वर कार्तिकी शेळ्या मेंढ्यांच्या यात्रेत स्पर्धा भरवली जाते या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बकऱ्याची निवड केली जाते या वर्षीच्या यात्रेमध्ये सोमनाथ माळी यांच्या बकऱ्याची चॅम्पियन बकरा म्हणून निवड करण्यात आली.
दोन जाती चार दाती, सहा दाती, जूळूक बकरा या सर्व बकऱ्यांच्या मधून हा चॅम्पियन बकरा निवडला गेला असून या चॅम्पियन बकऱ्यासाठी मार्केट कमिटीच्या वतीने अकरा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
मार्केट कमिटीचे सभापती संतोष पुजारी यांच्या अध्यक्षतेखली पंच म्हणून नाना पुजारी ,बाबू मेटकरी ,महादेव खरात, भीमराव पुजारी, पोपट सोनुर, गिरमल हाके, माणिक शेळके, यल्लाप्पा देशमुख, विश्वास जाधव, नामदेव भिसे, प्रकाश मोटे, सुभाष तुरे, निवृत्ती माने ,पप्पू डोंबाळे ,कलाप्पा पुजारी ,मदप्पा सावकर , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन दडस ,डॉ. यशोदीप कांबळे ,डॉ.अविनाश चव्हाण, डॉ. लक्ष्मण गाढवे निवड समितीत समावेश होता.
संपूर्ण राज्याचे उत्तरेश्वर कार्तिकी यात्रेकडे लक्ष लागून राहिले आहे या यात्रेमध्ये शेळ्या मेंढ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी-विक्री होते तर मडग्याळ जातीच्या मेंढ्यांना व बकऱ्यांना गगनाला भेटेल असे दर असतात.
फोटो.. सोमनाथ माळी यांच्या बकऱ्याला चॅम्पियन देताना संचालक तानाजीराव पाटील सभापती संतोष पुजारी व मान्यवर







