झरेत उद्यापासून मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण
अर्जदार सकल मराठा समाज इारे अध्यक्ष श्री चंद्रकांत घोरपडे व उपाध्यक्ष श्री. संतोष यादव राइझरे ता. आटपाडी जि. सांगली.
मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळावे म्हणून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे.
याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राभर मराठा समाज आंदोलन करीत आहे
पिढ्यानपिढ्या मराठा समाजावर होणारा अन्याय थांबावा व मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्रभर मराठा समाज शुक्रवार दिनांक 1/12/2023 पासून शांतलेले बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहे
सादर मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा म्हणून मौजे झरे ता. आटपाडी जि.सांगली येथील सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक 1/12/2023 पासून सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत मौजे झरे येथे बेमुटत साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
तरी महाराष्ट्र सरकारने राज्यातील तमाम मराठा समाजाच्या रास्त मागणीचा विचार करून मराठा समाजास तात्काळ ओबीसी प्रवर्गातून आरक्षण जाहीर करून पिढ्यानपिढ्या मराठा समाजावरती होणारा अन्याय थांबवावा. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.







