अवकाळीच्या तडाख्यात स्वप्नांचा चिखल
तात्काळ नुकसान भरपाईची मागणी
त-हाडी
. पावसाळ्याचे चार महिने तूरळक पडणाऱ्या पावसाने पावसाळा संपताच धोधो बरसायला सुरवात केली चार महिने अनेक भागात पावसाने हजेरी देखील लावली नव्हती त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती अनेक भागात खरीप हंगामातील पिके सुद्धा झाली नाही शेतकरी पुरता कोलंडून पडत असतांना थोड्याफार पाण्यावर वाचवलेली मका कापूस, कांदा , केळी पंपई या पिकांसह नगदी पिकांचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाल्याने आपल्या स्वतःच्या डोळ्यासमोर मुलाप्रमाणे वाचवलेली पिके भुईसपाट होतांना पाहून बळीराजा पुरता हदरला आहे अवकाळीच्या तडाख्यात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावयाच्या स्वप्नाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे
शिरपूर तालुक्यातील त-हाडी वरुळ भटाणे अभानपुर सह जवळपास सर्व गावांना अवकाळी पाऊस पडला, सोसाटयचा वारा केळी , पंपई बागांची पाने आणि घड अक्षरशः गळून पडले,लाखो रुपये खर्च करून केळी , पंपई कमवले आता ऐन फुलारा, मनी सेटिंग या अवस्थेत पंपई आले अवकाळीच्या तडाख्यात एकही घड झाडाला राहिला नाही घड तुडून जमिनीवर अंथरून पडले आता केळी पंपई पिकाने लाखो रुपये कर्ज डोक्यावर आहे ते फेडणार कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे कांद्याच्या पातीचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले, काढणीला आलेला कांदा डोळ्यासमोर नष्ट झाला, नगदी पिके सुद्धा या अवकाळी च्या तडाख्यातून वाचली नाही मकांची पाने चिरून गेली आहे त्यामुळे जनावरंच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे
शेती एक जुगार झाली असून लाखो रुपयांचे भांडवल शेतकरी स्वतःच्या हाताने अगोदर मातीत फेकतो नंतर चार पैसे होतील अशी अपेक्षा असते पण प्रत्येक वर्ष शेतीसाठी वाईट येत आहे कोरोना नंतर शेतकरी सावरेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण कधी कवडीमोल भाव तर कधी निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी पुरता मनातून खचला असून हवालदिल झाला आहे
पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे प्रशासन लवकर पंचनामे करत नाही आणि उशिरा झाले तर नुकसान फारसे दिसत नाही शेतकरी पीक बाहेर काढून घेतो त्यामुळे नुकसान टक्केवारी घसरून शेतकऱ्यांना तोकडी नुकसान भरपाई मिळते त्यामुळे भेटीचे सोपस्कर पार पडण्यापेक्षा सरसकट पंचनामे करावे अशी मागणी होत
चौकट
शिरपूर तालुक्यातील सर्व गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे केळी, कांदा, गहू यासह नगदी पिके भुईसपाट झाली आहे पंपई बागांची घड अवकाळीच्या तडाख्यात गळून पडली आहे पालकमंत्री काही ठिकाणी भेट दिली तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनला दिल्या आहे प्रशासनाने कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करावे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याकडे लक्ष द्यावे,
फोटो शिरपूर तालुक्यातील अभानपुर शिवारातील महेंद्र गोसावी यांच्या केळी पिकाची अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान व कृषीविभाग च्या वतीने नुकसानाची पाहणी करताना कृषी सहायक महेंद्र पाटील, ललित पाटील, किरण भामरे, तलाठी संतोष अहिरे भावनेश पाटील, राजेंद्र कोळी शेतकरी






