शिरपूर विधानसभा भा.ज.पा. आध्यात्मिक समन्वय आघाडीचे निवडणूक प्रमुख पदी सुनील साहेबराव पाटील यांची नियुक्ती
तऱ्हाडी:- भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले व भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांच्या आदेशानुसार महा विजय २०२४साठी शिरपूर विधानसभा भा.ज.पा. आध्यात्मिक समन्वय आघाडीचे निवडणूक प्रमुख पदी भटाणे ता. शिरपूर येथील ह.भ.प.सुनील साहेबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे
या नियुक्ती झाल्याबद्दल धुळे जिल्हा भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष विलास मोरे.पालकमंत्री नामदार गिरीश महाजन. आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत खासदार डॉ हिना गावीत.आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी.तालूका अध्यक्ष किशोर माळी .विजय देवरे व भटाणे येथील ग्रामस्थांनी यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे







