सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोंढावळ येथे विज्ञान प्रदर्शन
त-हाडी
कोंढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात विज्ञान पंधरवाडा निमित्त शालेय अंतर्गत गणित विज्ञान प्रदर्शन संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलीत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोंढावळ शाळेत श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती व विज्ञान पंधरावाडा शालेय अंतर्गत निमित्त विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. त्यात विदयार्थ्यांनी गणित व विज्ञान उपकरणाचे सादरीकरण केले.गणित गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली
.त्यात विविध गणिती सिद्धान्त व ऊर्जा, आरोग्य, परिवहन विषयी उपकरणे तयार केली होती. विद्यार्थ्यांना गणित शिक्षक आर. एच. खैरनार, विज्ञान शिक्षक वाय. एस. शिंपी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. एस. जगताप यांना देण्यात आले. सूत्रसंचालन के. एस. सैंदाणे यांनी केले.
जी. डी. वाल्हे यांनी रामानुजन यांच्या विषयी माहिती सांगितली.एम. एम. माळी मॅडम यांनी आभार मानून गणित प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षक पी. टी. परदेशीं,आर.एच. खैरनार, वाय. एस. शिंपी, जी. डी. वाल्हे, के. एस. सैंदाणे,एम. एम. माळी मॅडम , एस. पी. सोनवणे मॅडम व शिक्षेकेत्तर कर्मचारी आर. एम. माळी, एस. डी. बैसाणे यांनी प्रयत्न केले.







