त-हाडी येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड नामजप यज्ञ याग सप्ताह
त-हाडी ता.२१ : येथील श्री स्वामी समर्थ ( दिंडोरी प्रेरित) आध्यात्मिक बाल संस्कार केंद्रात अखंड नामजप यज्ञ, याग सप्ताहास ता. २० डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे.
श्री दत्त जयंतीनिमित्त येथील केंद्रात दरवर्षी अखंड नामजप सप्ताहाचे आयोजन करण्यात येते, यावर्षी चाळीस हुन अधिक सेवेकरी गुरुचरित्र पारायणास बसले आहेत.सप्ताह कालावधीत अखंड प्रहर सेवा सुरू आहे.यामध्ये सात दिवस अखंड चोवीस तास सेवा असून.
यामध्ये विनावादन, श्री स्वामी समर्थ साराअमृत सेवा करण्यात येत आहे. ता.२० डिसेंबर ते २६ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन असून,ता.२७ डिसेंबर रोजी महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.
आयुष्यातील दुःख,संकटे,पिडा,दोष यावर रामबाण उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण असे संबोधले जाते,या सप्ताहात भागवत पारायण,गुरुचरित्र पारायण,श्री दुर्गा सप्तशती पाठ,श्री स्वामी चरित्र पारायण,श्री नवनाथ पारायण,श्रीपाद चरित्र पारायण,श्री स्वामी चरित्र साराअमृत आदी सेवा देखील सुरू आहेत.सप्ताह सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रातर्फे करण्यात येत आहे.
छायाचित्र -त-हाडी -येथील स्व आण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे,या कालावधीत गुरुचरित्र पारायणास बसलेले महिला सेवेकरी







