यशवंत हायस्कूल शिरभावी येथे योगा बाल व युवा संस्कार वर्ग संपन्न
सांगोला प्रतिनिधी
शिरभावी तालुका सांगोला येथील यशवंत हायस्कूल शिरभावी येथे योगा बाल व युवा संस्कार वर्ग संपन्न झाला यावेळी योगाभ्यासक बाळासाहेब वाळके व एकनाथ शिंदे गुरुजी यांनी सध्याच्या युगात सगळीकडे आपण आपल्या अवतीभवती घडत असलेल्या घटनांपैकी बहुतांश घटना या वाईट घडत असतात
हे वास्तव आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडियातून नेहमी पाहत असतो या युगात ज्ञानेश्वर माऊली स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले माता अहिल्यादेवी डॉक्टर अब्दुल कलाम या महापुरुषांसारखे प्रभावी व्यक्तिमत्व घडावे
तसेच विविध क्षेत्रातून टॉपला मुले जावीत सुसंस्कृत निरोगी पिढी तयार व्हावी शिवाय सर्व मुलांच्या शारीरिक व मानसिक बौद्धिक स्थर वाढावा तसेच शालेय जीवनाबरोबर व्यवहारी क करिअर व जीवन सुखी समृद्धी व्हावे त्या उच्च उदात्त हेतूने बाल व युवा संस्काराचे अभ्यासक बाळासाहेब वाळके यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना अभ्यास व्यायाम योगा व बौद्धिक खेळांचे महत्त्व तसेच मोबाईलचे व व्यसनांचे दुष्परिणाम सांगून मंत्रमुग्ध केले
विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार सर सदस्य मिनीनाथ पवार यांनी त्यांचे स्वागत करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेडकर के एस सर यांनी तर आभार सुरवसे सर यांनी मानले