सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा
सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
माळशिरस तालुक्यातील बचेरी, शिंगोर्णी, सुळेवाडी ही कायमस्वरूपी दुष्काळी गावे आहेत .गेली दोन वर्षे झाले या गावांना पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अक्षरशः या दोन वर्षात या तिन्ही गावांना शेतातून एका पिकाचाही आधार नाही. अल्प पर्जन्यमान असल्यामुळे धान्याचा प्रचंड तुटवडा आहे. जनावरांना चाऱ्याची खूप मोठी समस्या शेतकरी बांधवांना भेडसावत आहे. शासनाकडून टॅंकरने पाणीपुरवठा आहे. तेपण एकाच टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्यामुळे एका कुटुंबाला पंधरा ते वीस दिवसातून पाणी येत आहे. त्यामुळे पाण्याची ही खूप मोठ्या प्रमाणात गोरगैरसोय होत आहे .बचेरी गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ राणीताई विश्वजीत गोरड यांनी दुसरा टेंकरची मागणी केली परंतु दोन ते तीन वेळा प्रस्ताव देऊन ही त्याबाबत उचित कारवाई झालेली नाही.
गेली एक महिना झाले सरपंच प्रांत कार्यालयात हेलपाटे मारत आहेत परंतु सदरचा प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला पाठवला आहे म्हणून प्रांत ऑफिस मधून टोलवा टोलवीची उत्तरे मिळत आहेत. दुष्काळी गावांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून दुष्काळी अनुदान देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु हे समाधानाचे वातावरण अल्पकाळासाठीच राहिले. ज्यावेळी दुष्काळी अनुदानाची यादी जाहीर झाली त्यावेळी पिकांचा कोणताही सर्वे न करता चुकीच्या पद्धतीने अनुदान जाहीर केले
. एक हजार आणि दोन हजार अशा पद्धतीने खात्यावर पैसे जमा झाले ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपये अनुदान जमा झाले त्या शेतकऱ्यांना हेलपाटे मारणे, केवायसी करणे तसेच कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी एक हजार रुपयांच्या वरती खर्च आला , म्हणतात ना हरभारे खाल्ले हात कोरडे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना कसलाही दुष्काळी अनुदानचा फायदा झालेलाा नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी दिसून येत आहे. ज्या भागात कॅनॉलचे पाणी आहे व ज्या भागात सक्षम पाण्याची स्रोत आहेत अशा भागाला पन्नास हजार ते एक लाख रुपये पर्यंत अनुदान मिळाले मात्र ज्या गावांना पिण्यासाठी पाणी नाही , एकाही पिकाचे उत्पादन झाले नाही अशा गावांना अत्यंत अल्प प्रमाणात मदत करून सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर सुळेवाडी गावात दुष्काळी अनुदानासाठी यादी आलेली आहे त्यापैकी केवायसी करून सुद्धा 50% लोकांना अजून जळीत अनुदान जमा झालेली नाही त्याबद्दल सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांनी उर्वरित पन्नास टक्के लोकांचे पैसे खात्यावर त्वरित जमा करावेत अन्यथा तहसील कार्यालयासमोर जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सदरचे अनुदान यादी तयार करताना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन अभ्यासपूर्वक यादी तयार केली नसल्याची माहिती मिळत आहे. कदाचित तोंड बघून अनुदान जमा केल्याची कुजबुज बचेरी, सुळेवाडी ,शिंगोर्णी भागातत सुरू आहे.