• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

माणगंगा by माणगंगा
May 10, 2024
in सामाजिक
0
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश !

16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

श्री तुळजाभवानी मंदिरात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले आहेत म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ताशेरे ओढत या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने रद्दबातल ठरवला आहे.
 
तसेच आधीच्या चौकशी समितीने दोषी ठरवलेले लिलावदार, मंदिर कर्मचारी, विश्वस्त, शासकीय अधिकारी-कर्मचारी आदी 16 दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेशही दिले आहे. आई तुळजाभवानीच्या कृपेने गेली 9 वर्षे न्यायालयीन लढा देणार्‍या हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा यांसह देशभरातील कोट्यवधी देवीभक्तांना आनंद आणि दिलासा देणारा हा निर्णय आहे. देवनिधी लुटणार्‍या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करू, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे. 

वर्ष 1991 ते 2009 या काळात दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्यावर विधीमंडळात चर्चा झाली. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या निर्देशानुसार वर्ष 2011 मध्ये या घोटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी चालू झाली; मात्र यात प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी गुंतलेले असल्यामुळे 5 वर्षे झाले, तरी चौकशी पुढे सरकत नव्हती. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या साहाय्याने उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात वर्ष 2015 मध्ये जनहित याचिका दाखल केली. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार वर्ष 2017 मध्ये चौकशी अहवाल गृह विभागाला सादर झाला; मात्र पाच वर्षे झाले, तरी त्यावर कारवाई होत नसल्यामुळे वर्ष 2022 मध्ये पुन्हा समितीने याचिका दाखल केली होती. 

त्यावर ‘पाच वर्षे झाली, तरी दोषींवर कारवाई का करण्यात आली नाही ?’, अशी विचारणा उच्च न्यायालयाने शासनाला केली. तेव्हा शासनाने हे प्रकरण जुने असल्याचे सांगून चौकशी बंद केल्याचे समोर आले. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘ललिताकुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार, 2014(2) एस्.सी.सी.क्र.1’ प्रकरणात ‘दखलपात्र गुन्हा घडल्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे’ आदेश दिले आहेत. त्याचा उद्देश सार्वजनिक दायित्व, दक्षता आणि भ्रष्टाचार थोपवणे या दृष्टीने आवश्यक असते, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यावर 8.45 कोटी रुपयांची लुट झालेली असतांना शंकर केंगार समितीनुसार दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे योग्य असल्याचे सांगून न्यायालयाने तपास चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या खंडपिठासमोर समितीच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता संजीव देशपांडे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी तथा अधिवक्ता उमेश भडगावंकर यांनी कामकाज पाहिले.
Views: 418
Share

Related Posts

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार
सामाजिक

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

July 8, 2024
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
सामाजिक

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात

June 11, 2024
चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो
सामाजिक

चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो

June 10, 2024
सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा
सामाजिक

सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

May 19, 2024
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!
सामाजिक

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!

April 23, 2024
सुनील पाटील लोकभूषण आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित24 वर्षाच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव
सामाजिक

सुनील पाटील लोकभूषण आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित24 वर्षाच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव

March 18, 2024
Next Post
मतदानाची टक्केवारी वाढवणे साठी त-हाडी येथे बी.एल.ओ.करता आहेत जनजागृती….

मतदानाची टक्केवारी वाढवणे साठी त-हाडी येथे बी.एल.ओ.करता आहेत जनजागृती….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)