आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी ता. आटपाडी येथे बहुजन समाजाची मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. तेथे मॉडर्न स्मशानभूमी उभारण्याची गरज आहे अशा आशयाचे निवेदन बसपाचे संतोष हेगडे यांनी तहसीलदार यांच्याकडे देऊन तेथे मॉडर्न स्मशानभूमी उभारणी करण्याची मागणी केली आहे
निवेदनात म्हटले आहे की .सध्या बहुजन समाजाच्या स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आहे .पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, स्मशानभूमी मोडकळी आली आहे. तरी तिथे नवीन मॉडर्न पद्धतीने सर्व सुख सोयी असणारी स्मशानभूमी उभारावी अशी मागणी बसपाचे संतोष हेगडे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
आटपाडी शहर हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण आहे. या शहरामध्ये मागासवर्गीय समाज्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु मागासवर्गीय समाज्यासाठी उत्तम दर्जाची स्मशाभूमी नाही. त्यामुळे मृत व्यक्तीच्या घरच्यांना व नातेवाईकांना स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी तसेच रक्षाविसर्जन कार्यक्रमावेळी गैरसोय होत आहे. आटपाडी ओढ्याच्या कडेला जुनी स्मशाभूमी आहे. परंतु ती मोडखळीस व जुनी झालेली आहे.
त्याठिकाणी आलेल्या लोकांना उन, वारा, पाऊस बचावापासून संरक्षण म्हणून शेड नाही. तसेच बसण्यासाठी व्यवस्थित सोय नाही. आजूबाजूला चिलारीचे प्रमाण भरपूर आहे, रात्रीच्या वेळी मृत व्यक्तीला दहन विधी करता वेळी लाईटची सोय नाही, तसेच पाण्याच्या टाकीची सोय नाही. त्यामुळे लोकांना नाहक त्रास होत आहे.
या सर्व बाबीचा विचार करून नगरपंचायत प्रशासक म्हणून आम्ही अपणाकडे मागणी करीत आहे. शहरामध्ये मागासवर्गीय समाज्यासाठी मॉडर्न पद्धतीची स्मशानभूमी उभी करावी,
त्यामध्ये आर.सी.सी. स्मशानभूमी इमारत उभी करावी.चारबाजूनी वॉल कंपाऊंड करावे व झाडे लावावी. लाईटची व्यवस्था करावी. बंदिस्त पाण्याच्या टाकीची सोय करावी.लोकांना बसण्यासाठी बाकडे तसेच ऊन, वारा, पाऊस बचावासाठी शेड उभारावे. अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष हेगडे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार सागर ढवळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली
.