दिघंचीत पोक्सो ऍक्ट विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील गर्ल स्कूलमध्ये पोक्सो अॅक्ट विषयावर तालुका विधी सेवा समिती व पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने गर्ल्स हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना पोक्सो ऍक्ट या विषयावर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम हा दिवाणी न्यायाधीश विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास सह दिवाणी न्यायाधीश अनंत टेंगसे, वकील संघटनाचे उपाध्यक्ष ऍड सोनाली कुलकर्णी,पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे, मपोह/मिसाळ मॅडम, पोकॉ कांबळे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बालक कोणास म्हणावे, जर बालकांवर लैंगिक अत्याचार होत असेल तर त्यांनी याबाबत भिती न बाळगता निर्भीडपणे होणाऱ्या अन्याया विरूध लढले पाहिजे. त्यांच्यासाठी कार्यरत असणाऱ्या प्रशासनचा उपयोग करून अन्याया विरूद्ध लढले पाहिजे. सर्वासाठी पोलीस यंत्रना, न्याय व्यवस्थ यांच्यावर विश्वास दाखवला पाहिजे.
अशा विविध विषयावर ० ते १८ या वयोगटातील बालकानां पोक्सो अॅक्ट विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच GOOD TOUCH AND BAD TOUCH बाबत विद्यार्थिनींना यामधील अंतर सुध्दा समजले पाहिजे या विषयी सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थीनीना शासना प्रती विश्वासाची भावना निमार्ण करून कायद्याची सविस्तर माहीती देण्यात आली आहे. पोक्सो सारख्या महत्वाच्या विषयावर येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल गर्ल्स हायस्कूल दिघंची च्या मुख्याध्यापीका सांळूखे सह शिक्षक यांनी याबाबत न्यायालय व पोलीस ठाणे चे आभार मानले.
फोटो..मार्गदर्शन करताना न्यायाधीश विनायक पाटील
Activate Windo