टेकवाडे शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त रांगोळी स्पर्धा
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. सर्वप्रथम स्त्री शिक्षणाच्या प्रणेते पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन टेकवाडे गावातील माता पालकांकडून व शाळेतील श्री शिक्षिका यांच्याकडून करून घेण्यात आले. त्यानंतर सर्व माता-पालक व शाळेतील स्त्री शिक्षिका यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत असणारी इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनी हितेश्वरी भैय्या धनगर हिने मी सावित्रीबाई फुले बोलते हे एक पात्री नाट्य सादर केले त्यातून सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाबद्दल कळले. त्याचबरोबर स्त्रियांचे शिक्षण किती महत्त्वपूर्ण आहे हे समजले.
शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र खोंडे यांनी उपस्थित माता पालक व विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांनी ज्या काळात स्त्री शिक्षणाची सुरुवात केली त्या वेळच्या समाजाची अवस्था काय होती ते समजावून सांगितले त्याचबरोबर सर्व स्त्रीयांनी माता सावित्री यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली पाहिजे व कायमस्वरूपी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे तसेच सध्या समाजात चाललेल्या अंधश्रद्धांच्या मागे न लागता आपल्या पाल्यांच्या विकासासाठी माता म्हणून आपले कर्तव्य केले पाहिजे असे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. सदर कार्यक्रमाला माता पालक म्हणून ताराबाई ढोले, वर्षा वाडीले, कविता धनगर,ताराबाई भोई,वर्षा वडीले,मनीषा वडिले,मीराबाई वाडिले,संगिता ढोले,भारती शिरसाठ उपस्थित होत्या.
त्यांनी रांगोळी स्पर्धेचे परीक्षण करून रांगोळी स्पर्धेत प्रथम पाच क्रमांक काढले त्यात प्रथम हितेश्वरी धनगर व्दितीय कृतिका धनगर तृतीय मिताली भोई चौथी सायली वडीले,पाचवी अक्षदा येशी या विद्यार्थिनी बक्षीस पात्र ठरल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी केले उपस्थित आमचे आभार उपशिक्षिका बबीता काटोळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक संजय पटेल बालवाडी शिक्षिका सुनंदा सोनार शिक्षकेतर कर्मचारी भाईदास पावरा ज्ञानेश्वर वारूडे यांनी परिश्रम घेतले.







