राजेवाडीत श्री श्री सदगुरु साखर कारखानाच्या दूषित पाण्याविषयी विशेष ग्रामसभेचे आयोजन
आटपाडी प्रतिनिधि
आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील सद्गुरु कारखान्याच्या प्रदूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले असल्याची माहिती लोकानयुक्त सरपंच प्रशांत शिरकांडे यांनी दिली आहे .
जल प्रदूषण, वायू प्रदूषण, राजेवाडी तलावातून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करणे, शेतकऱ्यांच्या तसेच कामगारांच्या तक्रारी व इतर विषय ग्रामसभेतघेण्यात आले आहेत.
श्री श्री सद्गुरू कारखाना सन 2011-12 ला गळीत हंगामाने सुरू झाला . तेव्हापासून मळीच्या पाण्याचे कोणतेही नियोजन कारखान्याने केले नाही . हा कारखाना उंचावर असल्याने दोन किलोमीटर परिसरात असलेल्या राजेवाडी येथील वॉटर सप्लायच्या विहिरीपर्यंत दूषित पाण्याचे प्रदूषण होत आहे .
तसेच 2021 च्या डिस्टीलरी प्लांट मुळे कारखान्यातून निघणारे केमिकलचे पाणीही उघड्यावर सोडल्याने येथील तीन शासकीय पाझर तलावही बाधित झाले आहेत .
हा कारखाना राजेवाडी ग्रामपंचायत हद्दीट असल्याने व गावापासून कारखाना दोन किलोमीटर अंतरावर आहे.
या कारखान्याच्या सांडपाण्यामुळे पाझर तलावासहित गावचा ओढाही प्रदूषित झालेला आहे . या ओढयावरच वॉटर सप्लायची विहीर असल्यामुळे ग्रामस्थ हे पाणी पिऊन विविध आजारांनी ग्रस्त आहेत.
या कारखान्याने दूषित पाण्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले असल्याची माहिती सरपंच प्रशांत शिरकंडे यांनी दिली .
या ग्रामसभेस चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक, तालुका प्रशासन प्रमुख म्हणून तहसीलदार, बीडीओ, पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही हजर राहण्याचे आवाहन केले आहे .







