झरे महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली, पद्मभूषण डॉ. क्रांतिविर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे. यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२३/२४ मधील राष्ट्रीय सेवा योजना शिबिर ६ जानेवारी ते १२ जानेवारी यादरम्यान पार पडत आहे. या शिबिराचा उद्घाटन समारंभ दिनांक ६ जानेवारी रोजी मौजे विरळी येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून विरळी गावच्या प्रथम नागरिक निलमताई घुटूकडे उपस्थित होत्या. उद् घाटक म्हणून त्या बोलताना म्हणाल्या की श्रम, त्याग, एकात्मता, बंधुता, सामाजिक समता या मूल्यांची ओळख या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होत असते.
तसेच अध्यक्ष म्हणून बोलत असताना संस्थेचे संचालक यू.सी. नलवडे म्हणाले की, संस्थेचे महाविद्यालय अतिशय दुर्गम आणि ग्रामीण भागातून असले तरी शिवाजी विद्यापीठाच्या पटलावर उठून दिसत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. हे तरुण विद्यार्थी हे भारताचे उद्याचे भविष्य आहेत. या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून या तरुणांना योग्य दिशा मिळेल अशी मला अशा आहे. या उद्घाटन समारंभाच्या वेळी विरळी गावचे उपसरपंच आनंद आटपाडकर, ग्रामपंचायत सदस्य मल्हारी भंडारे, सागर पडळकर, दीपक वगरे, अंजना सकट तसेच विरळी गावचे ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच प्रा. देवकुळे,डी.एस.,प्रा. पाटील एन. डी.प्रा. शिंगाडे, एम. एस.प्रा. चोपडे,के. एस.,प्रा. खांडेकर,एम.डी.प्रा. सौ. माने एम. एस.श्री. दत्ता सुळे आणि विद्यार्थी , विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.काळेल आर.व्ही. यांनी केले. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य, पाटील आर. एच.यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी समीर मुलाणी यांनी मानले.







