कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोडोली ता. पन्हाळा येथे जेष्ठ नागरिक हाॅल मध्ये माझी मंत्री आ.डॉ. विनायकराव मोरे यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस मित्र संघटनेच्या सभासदांना ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका व वाळवा तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुका व शाहुवाडी तालुका या चार तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
ओळख पत्र वाटप कार्यक्रम हा मा डॉ. विनयरावजी कोरे सावकर ( माजी मंत्री व विधानसभा सदस्य ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.. तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख मा. जि. एम. भगत सर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. विनयरावजी कोरे सावकर साहेब होते. मा. बाबासाहेब आभ्रे सर ( कोल्हापुर जिल्हाध्यक्ष ) यांनी प्रास्ताविक सादर केले तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून शिराळा पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. जयसिंग पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केले व पोलीसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी व पोलीसांच्या व्यथा शासन दरबारी व त्यांवर आवाज उठवण्याच काम हि संघटना उत्तम प्रकारे करत आहे याबद्दल त्यांनी संघटनेचे आभार मानले…
तसेच प्रमुख उपस्थितीत असलेले कोडोली पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. शितल कुमार डोईजड साहेब यांनी सुध्दा आपल्या भाषणात ते म्हणाले की पोलीसांची काही प्रश्न व अडी अडचणी मांडण्यासाठी पोलीसांची कोणतीही संघटना नसते पण ते प्रश्न आपल्या पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी मांडलेत व निवेदने देऊन पोलीसांच्या न्याय हक्कांसाठी तुम्ही लढून एक चांगल काम करत आहात याबद्दल ही त्यांनी आभार मानले, नंतर मा. बाबासाहेब आभ्रे सर यांनी आपल्या मनोगत मध्ये कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस बांधवांचा सिंहाचा वाटा आहे
आपल्या साठी अहोरात्र ऊन, वारा, पावसात झटणारे पोलीस बांधव हे देवदूताहून कमी वाटत नाही म्हणून पोलीस मित्र संघटना ही पोलीस बांधवांचा ताण कमी करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये ओळख पत्र प्रदान केलेले पोलीस मित्र यांना मिळालेली नवीन ओळख आणि खांद्यावर आलेली जबाबदारी ते प्रामाणिक पणे पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला .
तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये वारणा दूध संघाचे व्हाय चेअरमन मा. एच. आर. जाधव ( आण्णा ), माजी जिल्हा परिषद सदस्य व संचालक वारणा दूध संघाचे मा. शिवाजी मोरे (आप्पा ) तसेच कोडोली गावच्या सरपंच मा. भारती पाटील, मोहरे गावचे सरपंच आप्पासो शेळके, पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख महिला विजया ताई कर्णवर,जिवराज गुंड पाटील, राकेश कदम,माऊली वाणी ,रामचंद्र सरगर साहेब,सोलापूर जिल्हा जनसंपर्क प्रमुख पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत प्रकाश चौगुले व सोलापूर जिल्हा कायदेशीर सल्लागार मा. विजयकुमार खांडेकर उपस्थित होते.
तसेच या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. जि. एम. भगत सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यांनी संघटनेची ध्येय व उद्दिष्ट काय आहेत व पोलीस उपनिरीक्षकांच्या पदोन्नती साठी संघटनेने निवेदने दिली आहेत असे सांगितले व फक्त पोलीसांच्याच नव्हे तर सर्व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय व हक्कांसाठी संघटना लढत आहे हे सांगितले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.विनयरावजी कोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी मनोगतात पोलीस मित्र म्हणून पोलीस प्रशासनावर ताण कमी करण्याच काम करुन हि समाजसेवा करत असल्याबद्दल हि त्यांनी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे आभार मानले.
सर्व विभागातील पोलीस अधिकारी ने माझ्या पोलीस मित्र शिलेदारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची आशा व्यक्त केली.
या कार्यक्रमास पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे सांगली जिल्हा जनसंपर्क प्रमुख मा शहाजी कांबळे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मा. शशिकांत परिट ,मा.अमर काळे दादा कोल्हापूर जिल्हा जनसंपर्क प्रमुख,कोडोली शहराध्यक्ष सुधीर पाटील नाना,पन्हाळा तालुका अध्यक्ष विकास जंगम,पन्हाळा तालुका अध्यक्ष महिला माधुरी मोरे, शाहुवाडी तालुका अध्यक्ष महिला सुषमा पाटील,शिराळा तालुका अध्यक्ष गंगाधर धुमाळ,शिराळा तालुका अध्यक्ष महिला दिपाली पाटील,वाळवा तालुका अध्यक्ष राहुल वळीवडे, वाळवा तालुका अध्यक्ष महिला भाग्यश्री माने सर्व जिल्हा कमिटी,तालुका कमिटी पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता…