जेष्ठ समाजसेवक मा. श्री.बाबासाहेब आभ्रे ( सर )यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
मराठी भाषा गौरव दिन ,महाराष्ट्र शासनाचा उपक्रम चर्मोद्योग विकास महामंडळ (लीडकॉम )सुवर्ण महोत्सव ,संत रविदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सकल चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य ,सम्राट अशोक विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि संत रोहिदास महाराज सेवा संघ अहमद नगर यांच्या संयुक्त विधमाने जेष्ठ समाज सेवक मा.बाबासाहेब आभ्रे (सर )यांना सर्वाच्च समाज नागरिक “जीवन गौरव पुरस्कार “जाहीर झाला आहे.
सदर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि.27/2/2024 रोजी अ.नगर येथे आमदार संग्राम जगताप मा.आमदार बाबुराव माने ,मा.सुर्यकांत गवळी मा.कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन ,मा.अशोक विजयकर माजी चेअरमन लीडकॉम,मा.अशोक कानडे नगरसेवक व संस्थापक अध्यक्ष भारतीय उठाव संघ यांचे हस्ते संपन्न होणार आहे
श्री.बाबासाहेब दादू आभ्रे ( सर ) यांनी
आपल्या कार्य क्षेत्रातील कार्य -वसतिगृह अधीक्षक म्हणून 23 वर्ष सेवा सदर सेवा काळामध्ये वसतिगृह कर्मचारी संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ,राज्य सहसचिव पद,तसेच संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी काम केले आहे या दरम्यान वसतिगृह कर्मचाऱ्याना न्याय मिळवून देणे कामी आजाद मैदान येथे आंदोलन मुख मोर्चे इत्यादी मोर्च्याचे नेतृत्व केले आहे त्याच बरोबर वसतिगृहातील विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन करून 100% निकालाची परंपरा कायम ठेवून त्याना विविध शिष्यवृत्ती मिळवून देण्यामध्ये पुढाकार घेतला आहे
सामाजिक कार्यातील सहभाग-संत रोहिदास चर्मकार सेवा संस्था स्थापन करून ग्रामीण भागांमध्ये चर्मकार बांधावा मध्ये एकी निर्माण करून समाज एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे संस्थेच्या वतीने थोर मानवाच्या जयंत्या साजऱ्या करणे ,विविध सामाजिक उपक्रम राबवणे ,समाजातील लोकाना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे इत्यादी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेवून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे सध्या पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि त्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचे कार्य सुरु आहे…