केवल विकमनी यांची व्यथा व न्यायासाठी शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांना निराशेने जीवन त्याग/आत्महत्या करण्याचा ईशारा
पत्रकार जगदीश काशिकर यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात गांभीर्याने बघण्यासाठी आज निवेदनाद्वारे विनंति केली
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मी केवल विकमनी वय २६ वर्ष. मोबाईल नंबर 8879585802.
मी अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील चिकलोली गावात क्रिकेट फुटबॉल मैदान टर्फ चालवत होतो. ठाणे पोलीस आयुक्तालयातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन अंबरनाथ येथील पी.एस.आय. सुहास विठठल पाटील यांनी मला टर्फ चालवण्यासाठी वारंवार हफ्ता देण्यास त्रास देत होते व ५०,०००/- इतकी रकम हफ्ता वसूल केला आहे. त्यानंतर मी त्यांना पैसे दिले नाही व मी हफ्ता देण्यास नकार दिला म्हणूनच त्यांनी मला शिवीगाळ, लाथा, काठ्या, बुक्कयांनी मारहाण केली. अश्लील भाषेत शिवीगाळ करून रात्री क्रिकेट खेळण्यास आलेले खेळाडू व मला २००-३०० उठाबशा काढायला लावल्या व सीसीटिव्ही कॅमेरे ही बंद करण्यास सांगितले, परंतु मी चलाखीने ते बंद न करता यांची व यांच्यासोबत आलेले काही भागीदार, साथीदार या सर्वांची व्हीडिओ काढून ठेवला. नंतर मी वारंवार तक्रार करूनही यांच्यावर कोणीच काहीच कार्यवाही केली नाही. गेल्या मे-२०२३ पासून मी वारंवार तक्रारी व अर्ज करूनही कोणीच दादही देत नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना वारंवार भेटूनही कार्यवाही करण्यास विनंती केली परंतु आरोपी व तिकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे मित्र असल्याने त्यांनी आरोपीला वाचवण्याचे काम केले व माझ्यावर वारंवार अन्याय करून माझं आर्थिक, शारीरिक व मानसिक खच्चीकरण केले आहे.
या सर्वांनी मिळून सरकारी पदाचे दुरुपयोग केले व त्यानंतरही वारंवार मला त्रास देऊन सदरचे व्यवसाय मला बंद करण्यास भाग पाडले असून मी बेरोजगार झालो आहे. व सदरच्या उत्पन्नातून माझा उदरनिर्वाह चालू होता परंतु या अधिकाऱ्यानं मुळे माझे आर्थिक नुकसानही झाले असून मी कर्जबाजारी झालो आहे.
नवतरुण पिढी जे देशाचं येणार भविष्य आहे त्यांनी हफ्ता / लाच दिल्या शिवाय कुठलाही व्यवसाय करू नये व तरुण, नवीन व्यावसायिक आहोत आम्ही काही छोटा अधिकृत व्यवसाय करत असलो तर येऊन मारहाण, शिवीगाळ केली व तरुण पिढी १५-२० मुलांना २००-३०० उठाबशा काढायला लावल्या, परंतु उद्या यांच्यामुळेच माझ्यासारखे दुसऱ्या कोणाचे आयुष्य खराब झाले तर मानसिक त्रासामुळे चरस, गांजा, ड्रॅग्स दारू असे व्यसन करून तरुण पिढी चा भविष्य बरबाद होईल यांच्या अश्या कृत्यामुळे.
पोलिसांनी नागरिकांना मारहाण, शिवीगाळ, उठाबशा काढायला लावणे हे अधिकार त्यांना दिलेत का ??? नागरिकांसोबत अशी वागणूक करण्यासाठी यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री महोदय / ठाणे पोलीस आयुक्त महोदय यांनी आदेश दिलेत का ???
हफ्तवसुली करण्याचे आदेश यांना कोणी दिले आहेत ???
जर हे लोकांना जागेवरच शिक्षा देत आहेत तर न्यायालय कश्यासाठी आहेत ???
गेल्या काही महिन्यांपासून मी सतत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस उपायुक्त, डिसीपी, एसीपी व शिवाजीनगर पोलिस स्टेशन अंबरनाथ येथे पत्र व्यवहार करून गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करत असून तरीही काहीच कार्यवाही होत नसल्याने आता मी दिनांक १४-१-२०२४ पर्यंत जर शिवाजीनगर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक भगत, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री तुकाराम पदीर व पी.एस.आय. सुहास विठ्ठल पाटील या आरोपींवर जर गुन्हा दाखल करून कार्यवाही झाली नाही तर मी दिनांक १४-१-२०२४ ला माझे जीव देऊन आत्महत्या करणार याची नोंद घ्यावी.