शिरपूर तालुक्यात’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाला प्रारंभ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत उपक्रम
,२८२जिल्हा परिषद, १४२ खासगी शाळांचा समावेश
त-हाडी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राज्य शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाच्यावतीने १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी नियोजनाच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी गणेश सुरवडकर यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची नुकतीच आढावा सभा घेतली.
अभियानात सर्व शाळांनी सहभाग नोंदवून स्पर्धेमध्ये पुरस्कार प्राप्त करावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी गणेश सुरवडकर यांनी केले.
या अभियानात शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २८२ तर १४२ खासगी शाळांचा समावेश आहे.
या अभियानात स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनाच्या शाळा, अशा दोन वर्गवारीतून शाळेची निवड होणार आहे. या दोन्ही वर्गवारीतून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार तीन लाख रुपये, द्वितीय पुरस्कार दोन लाख रुपये, तृतीय पुरस्कार एक लाख रुपये राहणार आहे.
जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार ११ लाख रुपये, द्वितीय पुरस्कार पाच लाख रुपये व तृतीय पुरस्कार तीन लाख रुपये राहणार आहे.
विभागीय स्तरावर प्रथम पुरस्कार २१ लाख रुपये, द्वितीय पुरस्कार ११ लाख, रुपये तृतीय पुरस्कार सात लाख रुपये राहणार आहे.
राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार ५१ लाख रुपये, द्वितीय पुरस्कार २१ लाख रुपये व तृतीय पुरस्कार ११ लाख रुपये राहणार आहे.
या अभियानात सहभागी होणाऱ्या शिरपूर तालुक्यातुन ४२२ शाळांनी त्याअनुषंगाने तयारी सुरू केली असल्याचे दिसून आले.
आपल्या शाळेत ज्या ज्या सुविधा आहेत त्यांची माहिती व फोटो अपलोड करायचे आहे.
ज्या सुविधा नसतील त्या त्या सुविधांचा ४५ दिवसांत निर्माण करुन ती माहिती छायाचित्रांसह अपलोड करावी लागणार आहे.
तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांच्या विचार सभा घेतल्या आहेत.
तर केंद्रीय स्तरावर प्रमुख असलेल्या केंद्रप्रमुखांना मुख्याध्यापकांची केंद्रीय बैठक घेऊन उपलब्ध सुविधांची माहिती अपलोड करून घेत, उर्वरित सुविधांचा ४५ दिवसात पाठपुरावा करून उपक्रमात सहभागी करून घेणे आहे.
१००% सर्व शाळांनी सहभाग घेवा
, गणेश सुरवडकर , गटशिक्षणाधिकारी शिरपूर