आटपाडीत 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 75 दिव्यांगांना प्रशासनाची अनोखी भेट.
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी ता.आटपाडी येथे 75 व्यां प्रजासत्ताक दिनानिमित्त 75 दिव्यांग ना अंत्योदय कार्डचे वाटप तहसीलदार सागर ढवळे, तालुका कृषीअधिकारी मारुती कौलगे, पुरवठा अधिकारी दादासो पुकळे , ॲड निवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आज दिव्यांग बंधू भगिनी या एक वेगळीच आनंदी भावना घेऊन उपस्थित झाले होते. कारण होतं दिव्यांग लोकांना अंत्योदय या योजनेचा लाभ मिळण्यासाठी नव्याने आलेल्या अंत्योदय ई-शिधापत्रिका मिळणार होत्या.
गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांचे पुरेसं रेशन मिळत नसल्याबाबत तक्रारी होत्या. आ. बच्चुभाऊ कडू यांनी दिव्यांगांसाठी राखीव अंत्योदयचा इष्टांक वाढवून दिला व त्या अनुषंगाने तहसीलदार सागर ढवळे, निवासी नायब तहसीलदार प्रशांत कसबे व पुरवठा शाखेचे पुरवठा अधिकारी दादासो पुकळे , पुरवठा निरीक्षक नितीन शिंगाडे , समाधान हेगडे, प्रमोद राजमाने यांच्या विशेष सहकार्याने अंत्योदय योजना मध्ये समाविष्ट करून त्याचे ई कार्ड या कार्यक्रमांमध्ये दिव्यांगांना मिळाले.
अशाप्रकारे एकाच वेळी एवढ्या दिव्यांग बांधवांना अंत्योदय सेवेचा लाभ देणारे प्रशासन हे जिल्ह्यात अव्वल ठरले. शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशीही विशेष सेवा देऊन कागदपत्रांची पडताळणी करून, दिव्यांगांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी प्रशासना मार्फत घेतली गेली.
तालुक्यांतील जवळपास 75 दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे अनेक पदाधिकारी झटत होते. यामध्ये प्रामुख्याने प्रहार महिला जिल्हा सचिव कल्पना दबडे, महिला तालुकाध्यक्ष रेणुकाताई शिरकांडे, तालुका अध्यक्ष उमेश लांडगे, सचिव एकनाथ पडळकर, मार्गदर्शक एडवोकेट निवास पाटील,व गोमेवाडी महा-ई-सेवा केंद्र चालक रोहित देवकुळे यांनी दिव्यांगापर्यंत जनजागृती करणे व त्यांचे कागदपत्रे पुरवठा शाखेत जमा करणे, ज्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील त्याची पूर्तता करणे, अशा प्रकारे निरपेक्ष, निस्वार्थी भावनेने काम केले.
यावेळी दिव्यांग व्यक्तींचां तहसीलदार सागर ढवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. व दिव्यांग संघटनेमार्फत तहसीलदार व पुरवठा अधिकारी कर्मचारी व त्यांचा स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी आनंदराव ऎवळे व दिव्यांग बांधव उपस्थित होते.







