बामखेडा महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिराचे जिल्हा परिषद मराठी शाळा त-हाडी येथे उद्घाटन.
त-हाडी–
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व ग्रामविकास संस्थेचे कला महाविद्यालय बामखेडा. यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त माजी सैनिक प्रकाश वेडु डामरे यांच्या शुभहस्ते दिनांक २ फेब्रुवारी २०२४रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा त-हाडी येथे संपन्न झाले.याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कला महाविद्यालय बामखेडा तेथील प्रभारी प्राचार्य डॉ प्रा. बी.एन. गिरासे होते.
तसेच त-हाडी माजी सरपंच सुदाम भलकार , मल्हार सेना धुळे जिल्हा अध्यक्ष सुनील पाकळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश पाकळे, पिकं संरक्षण सोसायटी त-हाडी चेअरमन विलास भामरे, तंटामुक्त समिती उपअध्यक्ष युवराज भलकार माजी उपसरपंच ओंकार पाटील, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था त-हाडी माजी चेअरमन संजय जाधव प्रा. डॉ.दिलवरसिंग गिरासे, ज्ञानेश्वर भामरे मराठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील उपस्थित होते. या प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ गिरासे म्हणाले सक्षम युवा समर्थ भारत या स्थिमवरती सात दिवसीय शिबिरातून काहीतरी शिकून जायचे आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करीत असताना,आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांचे मुलांसमोर कथन केले. आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांच्या विकासासाठी हे तुमचे हक्काचे व्यासपीठ आहे . त्याच प्रमाणे चांगला नागरिक,संस्कारक्षम व्यक्ती होण्यासाठी सात दिवशीय शिबिर म्हणजे तुमची संस्कार शाळा आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून घ्यावा.यासाठी आमचे प्राध्यापक नेहमी तत्पर असतील असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.
वाय. सी. गावित.यांनी केले सूत्रसंचालन प्रा. डॉ. सी.एस. करंके यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.डी.बी.वाघ यांनी केले.







