पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वाळवा तालुका कार्याध्यक्ष ( महिला आघाडी ) पदी सौ. वंदना कांबळे
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वाळवा तालुका कार्याध्यक्ष ( महिला आघाडी ) पदी सौ. वंदना कांबळे यांची निवड पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार व गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या सुचनेनुसार मा. सुनील भाऊ पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या सहमतीने व मा. शहाजी कांबळे जनसंपर्क प्रमुख सांगली जिल्हा याच्या वतीने वंदना कांबळे यांची निवड करण्यात आली.
वंदना कांबळे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले काम संघटनेचे महत्त्व ओळखून पोलीस व नागरिक यांना मदत कराल व संघटनेची प्रतिमा उज्वल कराल असा संघटनेचा ठाम विश्वास आहे. कांबळे यांच्या निवडीचे करंजवडे व भागातील अनेकांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.







