एसटीच्या जलदसेवेमुळे प्रवाशी निवारे पडले ओस ..! अनेक ठिकाणी प्रवाशी निवाऱ्यात विविध व्यवसाय,प्रवाशी संकटात
त-हाडी, ता:४ : राज्य परिवहन महामंडळाच्या जलद सेवेमुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील प्रवाशांसा ठी उभारण्यात आलेले प्रवाशी निवारे ओस पडून गुराढोरांचे आश्रयस्थान बनले आहे. एवढेच नव्हे तर राज्य परिवहन महामंडळाच्या दुर्लक्षित कारभारामुळे प्रवाशी निवारे हॉटेल व्यावसायीकांनी काबीज केल्याने प्रवाशीवर्ग 'निराश्रीत' झाल्याचे चित्र वरुळ (ता.शिरपुर) सह चौफेर पाहवयास मिळते.
राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशां च्या ऊन, वारा,पावसाच्या संकटापासून सुरक्षितता देण्यासाठी, राष्ट्रीय व राज्य महामार्गासह अंतर्गत महत्त्वाचा रस्त्यांवर प्रवाशी निवारे उभारण्यात आले.राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी प्रवाशांना आकर्षित करण्याकरीता विविध योजना व सुविधा अंमलात आणल्या. एवढेच नव्हे तर “हात दाखवा एसटी थांबवा…” चा आदेशही काढला. मात्र योजना राबविणाऱ्या व सेवेत असणार्यांना उत्पन्नवाढ व प्रवाशीवाढीचे काहीही घेणे देणे नसल्याचे दिसुन येते. ब्रहानपूर ते अंकलेश्वर जाणाऱ्या सर्वच बसेस वरुळ व वडाळी हे थांबे सोडता जलद झाल्या.अन् या रस्त्यावरील सर्व प्रवाशी निवारे संकटात सापडले. तासनतास बसची वाट पाहणारे प्रवाशी खासगी वाहनाकडे आकर्षित झाले. त्यामुळे सर्वच रस्त्यावर खासगी वाहनांची रेलचेल वाढू लागली.
चोपडा ते शहादा महामार्गावरील बभळाज भोरखेड, हिंगणी, कुकावल कोठली आदी ठिकाणी प्रवासी निवारे वापराअभावी पडून असल्याने अवळला प्राप्त झाली आहे. तर हिसाळे भोरखेडा, कुकावल कोठली वरुळ व वडाळी येथे प्रवाशी निवारे उपलब्ध असतानाही परिवहन विभागाच्या दुर्लक्षित कारभारामूळे ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून रस्त्यावरूनच हरवल्यागत झाले.
बहुतांश जणांनी प्रवाशी निवार्यात हॉटेल, पान टपऱ्या थाटल्याने, त्याठिकाणी बसस्थानक असल्याची कल्पनाही करता येत नाही. प्रवाशांना बसची वाट पाहत रस्त्यावर तासन् तास जीव संकटात घालुन उभे राहावे लागते.त्याचप्रमाणे चोपडा ते शिरपूर व शिरपूर -शहादा रस्त्यावरही खौरे फाट्यावर उभारण्यात आलेल्या प्रवाशी शेड मध्ये अतिकमण करून हॉटेल व्यवसाय उभारण्यात आले असून बिचाऱ्या प्रवाशांना हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित राहवे लागत आहे. उन, वारा, पाऊस आदिंचा त्रास सोसत रस्त्यावर बिचाऱ्या प्रवाशांना बस अथवा खाजगी वाहनाची प्रतिक्षा करावी लागते.वरुळ ,वडाळी येथील प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले प्रवाशी निवारे अतिक्रमितांसाठी उत्पन्नाचे स्त्रोत बनून प्रवाशांच्या मुळांवर उठलेली दिसतात, तर कुकावल , कोठली फेस फाटा, बामखेडा आदी ठिकाणी प्रवाशी निवारे गुराढोरांचे आश्रयस्थाने बनली असून राज्य परिवहन महामंडळाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रवासी नी यांनी सांगितले.
राज्य परिवहन महामंडळाच्या जबाबदा
र अधिकाऱ्यांनी प्रवाशी निवार्यांवर झालेले अतिक्रमणे तातडीने हटविण्याची प्रवाशांच्या सुरक्षिततेला महत्व देण्यासंबंधी आग्रही भूमिका मांडल्या गेल्या. राज्य परिवहन विभागाने प्रवाशी निवारे स्वच्छ, सुंदर करण्यासोबतच प्रत्येक गावांवर बस थांबविण्यासाठी निर्देश देण्याची मागणी मराठा कुणबी पाटील बहुद्देशीय संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण आदींनी केली आहे.
प्रतिक्रिया:
विशाल करंके (सामाजिक कार्यकर्ते),”राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उदासिन व बघ्याची भूमिका न घेता प्रवाशांसाठी उभारण्यात आलेली प्रवाशी निवारे अतिक्रमणातून मुक्त करावीत, आजपर्यंत ज्यांनी बेकायदेशीर, विनापरवाना प्रवाशी निवाऱ्यात उद्योग धंदे केल्याने त्यांचेकडून भाडे वसूली करण्यात यावी.प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन प्रत्येक थांब्यावर बसेस थांबविणे सक्तीचे करून महसुलासह उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. बसेस थांबणे अनिवार्य केल्यास खासगी वाहतूकीलाही चाप बसेल “
फोटो- शिरपूर तालुक्यातील वरूळ व अर्थे येथील बसस्थानक प्रवासी निवारा असलेले अतिक्रमण, विखरण येथे जमीनदोस्त असलेला प्रवासनिवारा







