टेंभूच्या पाण्याने यादव वस्ती बंधारा टंचाई निधीतून भरून द्या- नेते शहाजी यादव यांची मागणी
दिघंची परिसरात सद्या भीषण पाणीटंचाई आहे माणगंगा नदी कोरडी पडली असून परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात आहे त्यामुळे दिघंची भागाला वरदायी ठरणारा यादव वस्ती बंधारा टेंभुच्या पाण्याने भरून द्यावा अशी मागणी शहाजी यादव व परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.
सध्या दुष्काळी परिस्थिती आहे तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे.
तसेच यावर्षी शासनाने आटपाडी तालुका दुष्काळ म्हणून जाहीर केलेला आहे आणि अशा दुष्काळी भागामध्ये पैसे गोळा करून टेंभूचे पाणी सोडणे शेतकऱ्यांना कदापि शक्य होणार नाही त्यामुळे शासनाच्या टंचाई निधीतून शेतकऱ्यांना पाणी सोडण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. लवकरात लवकर यादव वस्ती बंधारा टेंभूच्या पाण्याने भरून द्यावा तशी सूचना टेंभूच्या कार्यालयाला करावी अशी मागणी युवा नेते शहाजी यादव यांनी केली आहे.







