चाळीसगावात अजितदादा गटाकडून जल्लोष
चाळीसगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह ना.अजित दादा पवार गटाला मिळाल्याबद्दल आज दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वा.छत्रपती शिवाजी महाराज चौक चाळीसगाव येथे जल्लोष करण्यात आला
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्ष भाऊसाहेब दिनकर पाटील,युवक प्रदेश सरचिटणीस कुशल देशमुख,सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस किशोर जाधव, सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष खुशाल मोरे,ता. उपाध्यक्ष बापू आमले,ता.सरचिटणीस मंगेश साबळे,युवक शहर अध्यक्ष अर्जुन पाटील,अनिकेत चव्हाण, जितेंद्र आमले,दत्तू आमले,ऋषिकेश आमले,संदीप पाटील,सरदार कोळी,जगदीश पाटील,पियुष राजपूत, भूषण मोरे,राहून भाऊ,दिपक शिंदे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..







