पलूस तालुक्यात हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेच्या गाव शाखेचा शुभारंभ उत्साहात संपन्न
पलूस प्रतिनिधी
पलूस तालुक्यातील हजारवाडी, बुरुंगवाडी, भिलवडी स्टेशन, वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ, सुखवाडी, चोपडेवाडी, अंकलखोप, औदुंबर, नागठाणे, बुर्ली, कुंडल, आमणापूर, धनगांव, खंडोबाचीवाडी येथे हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेच्या शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सोबत शिवदास बिडगर, रुषी भैया टकले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, सागर मलगुंडे, विजय वावरे, सुभाष खांडेकर, कैलास वाघमारे, राहुल पुजारी, बाळू माने, भाऊसाहेब दुधाळ, महादेव पाटील, संदीप रासकर, अनिल पाटील, बाळू पांढरे, नवनाथ रणदिवे, शेखर रणदिवे तसेच शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते.







