बामखेडा महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिर त-हाडी येथे संपन्न
त-हाडी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व ग्रामविकास संस्थेचे कला महाविद्यालय बामखेडे त.त. यांच्या संयुक्त विद्यमाने रासेयो शिबिर त-हाडी येथे दिनांक २ फेब्रुवारी २०२४ ते ८ फेब्रुवारी२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
या सात दिवशीय शिबिरामध्ये संपूर्ण गावामध्ये साफ स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच गावांमधील ई- प्लास्टिक कचरा साफ करून त्याची योग्य विल्हेवाट लावली, स्वयंसेवकांनी जनावरांमधील लाळखुरगट लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.तसेच पशू संवर्धनाच्या विविध योजनांची माहिती या उपक्रमातून दिली .या काळात राष्ट्रीय सेवा योजना एक संस्कार,, दशरथ मांझी , द.माऊंटन मॅन, ई , कचरा, लोकशाही नेतृत्वाचे महत्त्व, ऊर्जा बचत काळाची गरज,. खान्देशातील स्वतंत्र सौनिक , योगाचे महत्त्व या सदर शिबिरामध्ये इत्यादी विषयावर तज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
८ फेब्रुवारी रोजी या शिबिराचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच सुदाम भलकार ,सचिव बी.व्हि.चौधरी त-हाडी गावाचे
प्रथम लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उज्जनबाई अहिरे , तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे मल्हार सेना धुळे जिल्हा अध्यक्ष सुनील धनगर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश पाकळे पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे माजी उपसरपंच अशोक सोनवणे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था माजी चेअरमन संजय जाधव,समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले होते, या प्रसंगी विविध स्वयंसेवकांनी आलेल्या सात दिवसाचे अनुभव मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केला
यामध्ये
कु.वैशाली पारधी .कु.अश्वीनी कोळी, राजकुमार चौधरी
इत्यादी स्वयंसेवकांनी आलेल्या सात दिवसांमध्ये हृदयस्पर्शी अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले, तुळशीराम भाईदास पाटील यांनी स्वयंसेवकांना आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता येणाऱ्या समस्यांना तोंड द्यायचे आणि यामधून यशस्वी कसे व्हायचे याविषयी मार्गदर्शन केले, नवीन पिढी जास्तीत जास्त मोबाईलच्या आहारी कशी जात आहे व मोबाईल चे दुष्परिणाम कसे होत आहेत यातून बाहेर पडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले सुदाम भलकार यांनी विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी जास्तीत जास्त परिश्रम घेणे,मेहनत, जिद्द चिकाट प्रामाणिकपणा, आपल्या अंगी बाळगणे आवश्यक आहे तसेच त्यांनी आदर्श स्वयंसेकासमोर मांडला,संस्थेचे सचिव बी. व्ही.चौधरी यानी विद्यार्थ्याचे आणि गावकऱ्यांचे कौतुक केले
.तसेच
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी,एन गिरासे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए.एम.गोसावी यांनी केले. आणि कार्यक्रमाचे प्रस्तावीक व सातदिवसाचा लेखाजोखा सहाय्यक कार्यक्रम आधिकारी डॉ. वाय.सी.गावीत यांनी मांडला. तर आभार प्रगटन डॉ. सी.एस.करंके यांनी मानले. याप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.बी.वाघ व महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ के .पी.पाटील तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.तसेच गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व जि.प.मराठी शाळेचे मुख्याध्यापक आणि त्याचे सहकारी , विविध वृत्तपत्रांचे पत्रकार बंधू , महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर बंधू उपस्थित होते.







