श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याला 25 लाखाचा दंड…
अखेर संतोष हेगडे यांच्या आंदोलनाला यश
श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी यांच्या दूषित रसायन युक्त पाण्यामुळे राजेवाडी परिसरातील शेतकऱ्यांची विहिरी तसेच तलावे दूषित बाधित झाली होती.
तसेच धुराड्यातून निघणाऱ्या दूषित वायूमुळे सर्व राजेवाडी करांच्या घरावरती रोज सकाळी राख पडत होती. कारखान्यामुळे होणारे जल प्रदूषण व वायू प्रदूषण लोकांच्या जीवितास हानिकारक ठरत होते या सर्व गोष्टीचा राजेवाडीकरांना त्रास होत होता.
राजेवाडी करांचे आरोग्य धोक्यात आले होते. अशा परिस्थितीमध्ये बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष माननीय संतोष हेगडे यांनी राजेवाडी परिसरातील दूषित पाण्याची पाहणी करून तहसीलदारांकडे तसेच प्रदूषण महामंडळ सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रदूषण महामंडळ अधिकारी यांनी दोन वेळा राजेवाडी साखर कारखान्याची पाहणी केली तसेच दूषित पाण्याचे सॅम्पल घेऊन पाणी दूषित असल्याचा अहवाल सादर केला तसेच कारवाई करण्याचे आदेश दिले.
परंतु प्रत्यक्षात कारवाई दिसून न आल्यामुळे संतोष हेगडे यांनी प्रदूषण महामंडळ सांगली यांच्या कार्यालयावरती जोडे मारो आंदोलन केले होते परंतु अधिकारी कारखान्यावरती कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे संतोष हेगडे यांनी पुन्हा आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनाला बसण्याचा निर्णय घेतला. आणि या निर्णयाला उत्तर म्हणून आंदोलनाची दखल घेऊन प्रदूषण महामंडळ सांगली यांनी राजेवाडी साखर कारखान्याला 25 लाखाचा आर्थिक दंड ठोठावला टावला आहे.







